गुणतालिका पूर्णपणे बदलण्याची शक्यता
By admin | Published: April 23, 2016 04:08 AM2016-04-23T04:08:39+5:302016-04-23T04:08:39+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वातील या टप्प्यात स्पर्धेचा सर्वदृष्टीने विचार करू. जवळजवळ गेल्या पंधरवाड्यात स्पर्धेत काय घडले.
रवी शास्त्री - आयपीएलच्या नवव्या पर्वातील या टप्प्यात स्पर्धेचा सर्वदृष्टीने विचार करू. जवळजवळ गेल्या पंधरवाड्यात स्पर्धेत काय घडले. काही संघांनी बरेच काही कमावले तर काही संघांनी बरेच काही गमावल्याचे चित्र आहे. काही संघ आपल्या लक्ष्यापासून भरकटले जाण्याची शक्यता आहे. ज्या खेळाडूंबाबत अधिक चर्चा होत नाही, त्या खेळाडूंबाबत विचार करू. युवराज सिंग कधी परतणार किंवा आशीष नेहराचे काही वृत्त. सुनील नारायणला पुन्हा केकेआरतर्फे खेळताना बघत आहोत पण, सॅम्युअल बद्रीबाबत काय म्हणता येईल. या मोसमात तो आरसीबीतर्फे खेळू शकेल, असे वाटत नाही. मुंबई इंडियन्सतर्फे किरोन पोलार्डने योग्यवेळी आपली छाप सोडली तर रॉयल चॅलेंजर्सचा आक्रमक सलामीवीर ख्रिस गेल मायदेशी परतला. गेल्या लढतीत गुजरात लायन्सतर्फे डेल स्टेनला खेळताना बघितले, पण ड्वेन स्मिथ अद्याप गुजराततर्फे प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र अहे. लसिथ मलिंगा व लेंडल सिमन्सची उणीव त्यांचा संघाला भासणार आहे. डॅरेन सॅमी व अॅन्जेलो मॅथ्यूज यांना यावेळी लिलावामध्ये एकाही फ्रॅन्चायझीने करारबद्ध केले नाही. हैदराबाद व गुजरात संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीत सुरेश रैना व शिखर धवन यांना सूर गवसल्याचे संकेत मिळाले. हे दोन्ही खेळाडू दिग्गज आहे. कृणाल नावाच्या आणखी एका पंड्याने आपली छाप सोडली. मुरुगन केवळ एकटा अश्विन नसल्याचे आपल्या निदर्शनास आले. कोहली, गेल, डिव्हिलियर्स आणि वॉटसन यांच्यासारख्या स्टार्सदरम्यान सरफराजलाही छाप सोडताना आपण अनुभवले. दिल्लीच्या संघावर प्रत्येक दिवशी राहुल द्रविडची छाप आणखी गडद होत असल्याचे दिसून येत आहे. या संघाची धुरा अशा खांद्यावर आहे की जे युवा खेळाडूंना दिग्गज बनविण्यास समर्थ आहेत.
मुंबई संघाने नेहमीप्रमाणे संथ सुरुवात केली. मुंबई संघ वॉर्मअप करीत असल्याचे भासत आहे. ‘धोनी अॅण्ड कंपनी’ योग्य संतुलन साधण्यास प्रयत्नशील आहे. केकेआरबाबत काय सांगता येईल. सध्या सर्वकाही ‘आॅलवेल’ आहे. हे सर्व असले तरी हे स्पर्धेचे सुरुवातीचे दिवस आहेत, हे विसरता येणार नाही. गुणतालिका पूर्णपणे बदलू शकते. सामने होणाऱ्या नव्या स्थळांची लवकरच माहिती मिळणार आहे. आयपीएल-२०१६ काही वेळेसाठी ‘डॅमेज कंट्रोल मोड’मध्ये दिसत आहे. (टीसीएम)