चंदीगड, बंगालचे विजय

By admin | Published: March 15, 2017 01:15 AM2017-03-15T01:15:01+5:302017-03-15T01:15:01+5:30

चंदीगडने मेघालयवर २-०ने तर पश्चिम बंगालने सेनादलवर एकमेव गोलने विजय मिळवत प्रतिष्ठेच्या संतोष चषक फु टबॉल स्पर्धेत आगेकूच केली. पश्चिम बंगालचा हा दुसरा विजय ठरला.

The conquest of Chandigarh, Bengal | चंदीगड, बंगालचे विजय

चंदीगड, बंगालचे विजय

Next

वास्को : चंदीगडने मेघालयवर २-०ने तर पश्चिम बंगालने सेनादलवर एकमेव गोलने विजय मिळवत प्रतिष्ठेच्या संतोष चषक फु टबॉल स्पर्धेत आगेकूच केली. पश्चिम बंगालचा हा दुसरा विजय ठरला.
येथील टिळक मैदानावर झालेल्या सामन्याच्या पूर्वाधात सुरुवातीला मेघालयाने आक्रमक खेळ केला. आठव्या मिनिटाला मेघालयच्या इनेस्टरच्या चालीवर पाले याचा शूट चंडीगडचा गोलरक्षक हरपीतपल सिंगने परतावून लावला. त्यानंतर ३५व्या मिनिटाला चंदीगडलाही चांगली संधी प्राप्त झाली होती़ या वेळी हर्षदीप सिंगने दिलेल्या क्रॉसवर अमनदीप सिंगचा हेडर दिशाहिन ठरला, त्यामुळे त्यांची संधी हुकली.
या सत्रातील ५१व्या मिनिटाला आघाडीचा गोल कितबोव्कांग पाले याने नोंदवला. या आघाडीमुळे मेघालयच्या गोटात आनंद पसरला होता. ६५व्या मिनिटाला जर्मनजीत सिंगने हेडरवर गंगादीप सिंगकडे चेंडू सोपविला. त्याने ही संधी साधत ‘रिबॉण्ड’वर गोल नोंदवला आणि चंडीगडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर लगेच चंदीगडला आघाडी घेण्याची संधी लाभली होती़ ६६ व्या मिनिटाला बदली खेळाडू अभिषेक शर्माचा शूट गोल पोस्टवरून बाहेर गेला. ८२ व्या मिनिटाला मेघालयचा बदली खेळाडू बिकीसन खारकोंगुरच्या चालीवर इनेस्टर याचा शूट गोलरक्षकने दूर केला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत (९१वे मिनिट) चंदीगडच्या अमरदीप सिंगने दिलेल्या चालीवर कर्णधार शिजपाल सिंगने मेघालयच्या दोन बचावपटूंना भेदत शानदार गोल नोंदवला आणि संघाला विजयश्री मिळवून दिला.

Web Title: The conquest of Chandigarh, Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.