अँटोनिओ यांना दिलासा

By admin | Published: November 1, 2014 12:34 AM2014-11-01T00:34:20+5:302014-11-01T00:34:20+5:30

अॅटलेटिको दे कोलकाताचे प्रशिक्षक अँटोनिओ लोपेज हबाज यांच्यावर घालण्यात आलेली चार सामन्यांची बंदी दोनने कमी करण्याचा निर्णय अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने (एआयएफएफ) घेतला आहे.

Console to Antonio | अँटोनिओ यांना दिलासा

अँटोनिओ यांना दिलासा

Next
मुंबई : अॅटलेटिको दे कोलकाताचे प्रशिक्षक अँटोनिओ लोपेज हबाज यांच्यावर घालण्यात आलेली चार सामन्यांची बंदी दोनने कमी करण्याचा निर्णय अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने (एआयएफएफ) घेतला आहे. 
23 ऑक्टोबरला गोवा संघासोबत झालेल्या लढतीनंतर अँटोनिओ वर चार सामन्यांची, तर अॅटलेटिकोचा खेळाडू फिकरू तसेच गोव्याचा मिडफिल्डर रॉबर्ट पिरेस यांच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली होती. मात्र, एआयएफएफच्या शिस्तपालन समितीने शुक्रवारी ही शिक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही संघाकडून कलम 143 अंतर्गत एआयएफएफकडे याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर हा निर्णय घेण्यात आला.  (वृत्तसंस्था)
 
च्23 ऑक्टोबर रोजी खेळाडू व कोच मडगाव येथे एफसी गोवा संघाविरुद्ध तणावपूर्ण सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध भांडले होते. 
च्अ. भा. फुटबॉल महासंघाने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत आयएसएल लीगमध्ये खेळणा:या अॅटलेटिको डी कोलकाता संघाचे कोच अंटोनियो लोपेझ यांना चार, तर दोन खेळाडू रॉबर्ट पायरेस आणि फिकरू लेमेसा यांना दोन सामन्यांसाठी निलंबित केले होते.
च्दोन्ही संघ हाफटाईममध्ये मैदानावरून परत जात असताना ही बाचाबाची झाली होती. हा सामना कोलकाताने जिंकला. सामन्यानंतर पत्रपरिषदेत गोव्याचे कोच जिको यांनी पायरेसला कोलकाताच्या कोचने ठोसा मारल्याचा आरोप केला होता.
च्निलंबनाशिवाय तिघांवरही एआयएफएफच्या शिस्तपालन समितीने पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. 
च्कोलकाता संघाचा गोलकिपर कोच प्रदीप कुमार बख्तावर यालादेखील पुढील सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते आणि  3क् हजार रुपयांचा दंड अकारण्यात आला होता. याविरुद्ध चार दिवसांच्या आत अपील करण्याची त्यानां परवानगी दिली गेली होती. 

 

Web Title: Console to Antonio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.