मला ऑलिम्पिकपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र; दत्तू भोकनळचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 20:31 IST2019-05-30T20:28:50+5:302019-05-30T20:31:19+5:30
माझे लक्ष विचलित करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. यामध्ये काही प्रथम वर्ग अधिकारी आणि काही उद्योजकांचाही समावेश आहे, असा गौप्यस्फोट आंतरराष्ट्रीय रोईंगपटून दत्तू भोकनळ यांनी केला आहे.

मला ऑलिम्पिकपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र; दत्तू भोकनळचा गौप्यस्फोट
टोकियो येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकपासून दूर ठेवण्यासाठी माझ्यावर खोटे आणि बेकायदेशीर आरोप केले जात आहेत. माझे लक्ष विचलित करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. यामध्ये काही प्रथम वर्ग अधिकारी आणि काही उद्योजकांचाही समावेश आहे, असा गौप्यस्फोट भारताचा आंतरराष्ट्रीय रोईंगपटून दत्तू भोकनळ यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण
दत्तू भोकनळ यांची पत्नी आशा यांच्याविरोधात फसवणूक केल्याची फिर्याद आडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर दत्तू भोकनळ याला बुधवारी सत्र न्यालायाने जामीन दिला आहे. दत्तू भोकनळ यांनी नातेवाईकांसमक्ष लग्न करण्याचे आश्वासन देऊन आळंदी येथे आपल्याशी वैदीक पद्धतीने लग्न केले. परंतु त्यानंतर दोनदा लग्नाची तयारी करूनही दत्तू लग्नासाठी पोहोचला नसल्याचे सांगितले, पण नंतर दत्तून नातेवाईकांसमोर लग्नास नाकार दिल्याचा आरोप करीत आशा भोकनळ यांनी दत्तू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर गुरुवारी (दि.30) दत्तूने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा गौप्यस्फोट केला असून याची सुरुवात आपल्याकडे पैशाची मागणी करण्यारासून झाल्याचे त्याने सांगितले.
काय म्हणाला दत्तू भोकनळ
देशासाठी पदक मिळवण्याचे माझे स्वप्न आहे. कारण माझ्यासाठी नेहमीच देश पहिला येतो. त्यानंतर रोइंग आणि त्यानंतर माझं कुटुंब येतं. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. मला प्रकरणात गोवायचं आणि 2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिकपासून दूर ठेवायचं, हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. हे माझ्याविरोधात केलेले षडयंत्र आहे. न्यायालयामध्ये काय सत्य आहे, ते सर्वांपुढे येईल. सध्या आपण ऑलिम्पिकची तयारी करीत असून आपल्यासमोर केवळ देशासाठी पदक मिळविण्याचेच ध्येय्य आहे.