पाळधी येथून पश्नपत्रिका आणून केल्या कॉप्या
By Admin | Published: March 2, 2016 12:03 AM2016-03-02T00:03:07+5:302016-03-02T00:03:07+5:30
जळगाव : शहरातील काही बहाद्दरांनी पाळधी येथील एका केंद्रावरून प्रश्नपत्रीकेची प्रत आणून त्या माध्यमातून विद्यानिकेतन विद्यालयातील केंद्राबाहेर ...
>जळगाव : शहरातील काही बहाद्दरांनी पाळधी येथील एका केंद्रावरून प्रश्नपत्रीकेची प्रत आणून त्या माध्यमातून विद्यानिकेतन विद्यालयातील केंद्राबाहेर कॉपी पुरविण्याचा सपाटा लावला. शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभियानावर या प्रकारामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डीआरडीच्या इमारतीमधून प्रवेश करीत पोहोचविल्या कॉप्याविद्यानिकेतन विद्यालयानजीक पाळधीच्या परीक्षा केंद्रावरुन प्रश्नपत्रीकेची झेरॉक्सप्रत काही युवकांनी आणली. आणि कॉप्या तयार करून ग्रामिण विकास यंत्रणा कार्यालयातून प्रवेश करीत त्या आपल्या मित्रांना पोहोचविल्या. विद्यालयाच्या भिंतीला भगदाड पाडून त्यातून शिरून विद्यालयामागे जाण्याचा प्रयत्नही काहींनी केला. हा प्रकार लक्षात आल्यावर लागलीच या भगदाडनजीक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला. ला. ना. विद्यालयात सुरळीतशेठ ला.ना.विद्यालय परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र केंद्रातील वर्गांमध्ये पंखे बंदच होते. तसेच पेपर सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.मॉडर्न हायस्कूलमध्ये आतून मदतया केंद्रावर बाहेरुन शांतता दिसत होती. वर्गांमध्ये मात्र विद्यार्थ्यांनी कॉपीच्या मदतीने पेपर सोडविण्याल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.का. ऊ. कोल्हे विद्यालयाभोवती गर्दीका. ऊ. कोल्हे विद्यालय केंद्रावर परीक्षे दरम्यान शांतता होती. मात्र परीक्षा केंद्राबाहेर गर्दी जमा झाली होती. पोलीसांकडून गर्दी वारंवार हटविण्यात येत होती. महाराणा प्रताप विद्यालयासमोर युवकांचा घोळकामहाराणा प्रताप विद्यालयाच्या परीक्षा केंद्राजवळ कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने काही युवक उभे होते. दोन ठिकाणी ७-८ पोलीस कर्मचारी असल्याने कोपी पुरविणार्यांना संधी मिळत नसल्याचे दिसून आले.