कोरोना इफेक्ट ;आयएसएलचा अंतिम सामना सुना-सुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 08:32 PM2020-03-14T20:32:12+5:302020-03-14T20:32:24+5:30

कोरोनामुळे फातोर्डा स्टेडियमवरील वातावरणही शांत होते. कधी नव्हे ते सेनेटायझर हाती आले तर तर सुरक्षा रक्षकाच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क झळकले.

Corona effect; ISL's final match is heard | कोरोना इफेक्ट ;आयएसएलचा अंतिम सामना सुना-सुना

कोरोना इफेक्ट ;आयएसएलचा अंतिम सामना सुना-सुना

Next

- सचिन कोरडे

कोराना व्हायरसमुळे संपूर्ण क्रीडा जगतही हादरले. काही सामने रद्द झालेत तर काही सामने क्लोज द डोअर खेळविण्यात येत आहेत. आयएसएलचा चेन्नई-कोलकाता यांच्यातील अंतिम सामना सुना सुना झाला. हा सामना पाहण्याची गोमंतकीयांसह देशभरातील फुटबॉलप्रेमींची तीव्र इच्छा होती मात्र नाईलास्तव त्यांना सामना टिव्हीवरच पाहावा लागला.

कोरोनामुळे फातोर्डा स्टेडियमवरील वातावरणही शांत होते. कधी नव्हे ते सेनेटायझर हाती आले तर तर सुरक्षा रक्षकाच्या प्रत्येकाच्या चेहºयावर मास्क झळकले. स्टेडियमच्या अवती भवती कोरोना इफेक्ट दिसून आला. आजच्या सामन्यात कोरोनाचा गोल परिणाम कारक ठरल्याचे चित्र होते. फायनल सामना असूनही माध्यम प्रतिनिधींची संख्याही कमी होती.
 

खास मेडीकल रुम

कोरोनामुळे स्टेडियमवर वद्यकिय सुविधेत वाढ करण्यात आली होती. दोन-तीन रुग्णवाहिका होत्या. तसेच स्टेडियमवर एक खास मेडिकल रुम तयार करण्यात आली. या रुममध्ये कोरोनासंदर्भात तपासणी मशिन ठेवण्यात आल्याचे एका वद्यकिय अधिकाºयाने सांगितले. मेडिकल डेस्क हा संकल्पना सुद्धा राबविण्यात आली.

नो सेलेब्रिटी, नो विदेशी...

चेन्नई एफसीचा सहमालक अभिषके बच्चन आणि एटीके कोलकाताचा सहमालक सारव गांगुली हे अंतिम सामना पाहण्यासाठी हजर असतात. यावर्षी मात्र ते गोव्यातील सामन्यासाठी आले नाही. याशिवाय मदानावर विदेशी चाहत्यांनाही प्रवेश देण्यात आला नाही.संघाच्या सपोर्ट स्टाफमध्येही काही तोकडेच विदेशी होती.

चाहते फिरकलेच नाहीत....

सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश मिळणार नाही. याची कल्पना प्रत्येकाला होती. प्रेक्षकांच्या तिकीटांचे पसेही परत करण्यात आले होती. त्यामुळे गोमंतकीय चाहते स्टेडियम बाहेरही फिरकले नाहीत. स्टेडियमभोवती केवळ पोलीस दलाच्या टीम्स होत्या. माध्यम प्रतिनधींनाही ओळखत्राशिवाय आत सोडण्यात येत  नव्हते.

Web Title: Corona effect; ISL's final match is heard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.