कोरोना महामारीमुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रक्रियेला उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 03:30 AM2020-04-27T03:30:57+5:302020-04-27T03:31:01+5:30
यावेळी महामारीच्या पार्श्वभूमीवर अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही. या महामारीमुळे जगभरात २ लाखांपेक्षा अधिक आणि भारतात ८०० पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची निवड प्रक्रियेला उशीर होत आहे. क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील महिन्यात पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येईल.
मंत्रालयातर्फे तसे एप्रिल महिन्यात नामांकन मागविण्यात येते तर पुरस्कार प्रदान समारंभ २९ आॅगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाºया राष्ट्रीय क्रीडा दिनी होत असतो. पण, यावेळी महामारीच्या पार्श्वभूमीवर अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही.
या महामारीमुळे जगभरात २ लाखांपेक्षा अधिक आणि भारतात ८०० पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाºयाने म्हटले की,‘सध्याची स्थिती बघता मंत्रालयाने अद्याप राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार अर्जासाठी परिपत्रक जाहीर केलेले नाही. नेहमी ही प्रक्रिया एप्रिल महिन्यात पूर्ण होते, पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. तरी परिपत्रक मेमध्ये जाहीर होईल, अशी आशा आहे.’
कोविड-१९ मुळे केवळ भारतातच नव्हे जर जगभरात क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. अधिकारी पुढे म्हणाले,‘गेल्या महिनाभरापासून देशात सरकारी व राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या कार्यालयातील कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. त्यामुळे उशिर होत आहे.’
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये राजीव गांधी खेल रत्न, अर्जून, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती हे पुरस्कार प्रदान करतात. (वृत्तसंस्था)