Corona Virus : पाकिस्तानच्या मदतीसाठी ब्रिटनचा आमीर खान सरसावला, करतोय धान्याचं वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 11:43 AM2020-04-08T11:43:14+5:302020-04-08T11:44:00+5:30
पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 4062 वर गेली असून 58 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा जगभरातील आकडा 14 लाख 31,973 इतका झाला आहे. मृतांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असून सध्या हा आकहा 82,096 इतका झाला आहे. आतापर्यंत 3 लाख 02,209 रुग्ण बरे झाले आहेत. पाकिस्तानातील काही भागांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी त्याच्या फाऊंडेशनतर्फे लॉक़डाऊन भागारीत गरिबांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहे. त्याच्या मदतीला आला ब्रिटनचा आमीर खान पुढे आला आहे.
पाकिस्तानातील परिस्थीती आटोक्यात आणण्यासाठी तेथील यंत्रणा काम करत आहे. त्यातून दूर देशात असलेला बॉक्सर आमीर खान यानेही मदतीचा हात पुढे केला आहे. मँचेस्टर येथील बॉल्टन येथे जन्मलेला आमीरचे मुळ पाकिस्तानातील रावळपिंडीचे आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रावळपिंडी जिल्ह्यातील पंजाबी रजपूत कुटुंबाशी त्याचं नातं आहे. त्यामुळे आमीरनं पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यानं पाकिस्तानी सैन्याची मदत घेतली आहे.
त्यानं लिहीलं की,''अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानात अनेक लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मदतीसाठीमी तांदूळ, पीठ, ज्युस, पाणी, पावडर मिल्क, साबण पाठवत आहे. पाकिस्तानी सैन्य या वस्तूंचा वाटप करण्यासाठी मला मदत करत आहेत. त्यांचे आभार.''
Seeing everyone suffer in Pakistan with food shortage due to the corona virus I have made bags which contain rice, flour, daal, chick peas, juices, water, powder milk, bars of soap. I would like to thank the pakistan Army for helping us distributing the bags @OfficialDGISPRpic.twitter.com/NfkW0Av31B
— Amir Khan (@amirkingkhan) April 7, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!
15 वर्षीय खेळाडूनं विकल्या त्याच्याकडच्या 102 ट्रॉफी; जमा केलेला निधी केला दान