Corona Virus : महाराष्ट्राच्या मल्लानं जपली सामाजिक जाण; राहुल आवारेनं केलं 'लाख'मोलाचं दान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 11:59 AM2020-03-31T11:59:42+5:302020-03-31T12:00:13+5:30
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी क्रीडा विश्व एकवटलं आहे. क्रिकेटपटूंप्रमाणे अन्य खेळांतील खेळाडूही पुढाकार घेताना पाहायला मिळत आहे.
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी क्रीडा विश्व एकवटलं आहे. क्रिकेटपटूंप्रमाणे अन्य खेळांतील खेळाडूही पुढाकार घेताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारेनंही कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारला मदतीचा हात दिला आहे. जागतिक स्पर्धेतील पदक विजेत्या बजरंग पुनियानं त्याचा सहा महिन्याचा पगार हरयाणा सरकारला दिला होता. राहुलनंही महाराष्ट्र सरकारला मदत केल्याची माहिती फेसबुकवरून दिली.
रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार
राहुलने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याने 61 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा 11-4 असा पराभव केला. राहुलने 2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. 'लोकमत'ने त्याला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले होते.
राहुलनं मुख्यमंत्री कोरोना रिलीफ फंडासाठी 2 लाखांची मदत केली आहे. पोलीस उप अधीक्षक असलेल्या राहुलनं 2 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री कोरोना रिलीफ फंडात जमा केला. यापूर्वी त्यानं सांगली - कोल्हापूर पूरग्रस्त भागात सुद्धा जीवनावश्यक वस्तू वाटप केले होते. महाराष्ट्रातील 5 गरजू मल्ल देखील त्याने दत्तक घेऊन त्यांच्या खुरकाचा खर्च दर महिन्याला तो करत आहे.
नमस्कार
Posted by Rahul Aware on Monday, March 30, 2020
मैं राहुल आवारे,
देश में कोरोंना वाइरस के कारण प्रभावित हुए मेरे देश वाशीयोंको छोटीसी मदत के तौर पर मैं...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
१ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच
Corona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान!
डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज