Corona Virus : महाराष्ट्राचे दहा गिर्यारोहक दार्जिलिंगमध्ये अडकले, सरकारकडे मदतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 08:26 PM2020-04-27T20:26:31+5:302020-04-27T20:27:51+5:30
लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी, भाविक अन्य राज्यांमध्ये अडकले आहेत.
कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सुरुवातीला हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता, परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 3 मे पर्यंत तो वाढवण्यात आला. लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी, भाविक अन्य राज्यांमध्ये अडकले आहेत. राज्य सरकार त्यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यात आता महाराष्ट्राच्या गिर्यारोहक दार्जिलिंगमध्ये अडकले असल्याचे समजते आहे.
''1 मार्चपासून आम्ही दार्जिलिंगमध्ये आलेलो आहेत. त्यावेळी लॉकडाऊन होईल, याबद्दल काही चिन्ह नव्हती. आम्ही दहा विद्यार्थी आहोत. गिर्यारोहक असल्यामुळे कोणाच्याही आरोग्याचा प्रश्न अद्यापतरी उद्भवलेला नाही. आता जवळपास दोन महिने झाले आहेत आम्ही इथेच आहोत. त्यामुळे आता सर्वांनाच घरी परतण्याची ओढ लागली आहे. 3 मे नंतरही जर लॉकडाऊन वाढणार असेल, तर कृपया आम्हाला राज्यात आणण्याची सोय करावी,'' अशी विनंती या गिर्यारोहकांनी केली आहे.
Corona Virus : महाराष्ट्राचे दहा गिर्यारोहक दार्जिलिंगमध्ये अडकले, सरकारकडे मदतीची मागणी #coronavirus@CMOMaharashtra@OfficeofUTpic.twitter.com/9nWlGpiOHt
— Lokmat (@MiLOKMAT) April 27, 2020
1 ते 29 मार्चपर्यंत ही दहा मुलं हिमालयात गिर्यारोहणाच्या कॅम्पला होती. त्यानंतर हिमालयावरून खाली आल्यावर त्यांना लॉकडाऊनबद्दल कळलं. इथे त्यांची राहण्या व खाण्याची व्यवस्थित सोय होत आहे, परंतु लॉकडाऊनमुळे इथे अडकल्यानं अनेकांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आम्हाला घरी पोहोचवण्यासाठी मदत करावी, अशी विनंती या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
दार्जिलिंग येथे अडकलेले महाराष्ट्राचे गिर्यारोहक
1. नितेश शिंदे - मुंबई
2. शशी कुमार - मुंबई
3. आशिष चव्हाण - मुंबई
4. चैतन्य राव - मुंबई
5. निशांत परेरा - मुंबई
6. अजित आर. - नागपूर
7. आदित्य शुक्ला - नागपूर
8. दीपिका करांडे - पुणे
9. दीपक कनोजिया - मुंबई
10. सुशांत अनवेकर - मुंबई