Corona Virus : राज्यातील क्रीडा संघटनांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 10:48 AM2020-04-05T10:48:20+5:302020-04-05T10:57:47+5:30
मावळी मंडळ, महाराष्ट्र खो-खो संघटना आणि महाराष्ट्र कॅरम संघटनेचा पुढाकार
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा ६०० च्या घरात पोहोचला आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यावर आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी हातभार लावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना अनेक जणांनी मदत केली. त्यात राज्यातील विविध क्रीडा संघटना आणि मंडळही सहभागी झाले आहेत.
ठाण्यातील ९५ वर्षे क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली श्री मावळी मंडळ संस्था गेली ७० वर्षे शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत आहे. परंतु या वर्षी आपल्या देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. संस्थेने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा जमा निधी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी व स्थलांतरित गरीब कामगार वर्गासाठी मुख्यमंत्री फंडांमध्ये १० लाखांचा धनादेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ह्यांच्याकडे सुपूर्द केला.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनकडूनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ लाख ११,१११ रुपयांची मदत केली गेली. महाराष्ट्रकॅरमआसोसिएशनतर्फेमुख्यमंत्रीसहाय्यकनिधीसाठीरुपये१लाख११,१११आर्थिकमदतदिलीगेली.