Coronavirus : ऑलिम्पिक स्थगित करण्याची अमेरिका, नॉर्वेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 01:57 AM2020-03-22T01:57:34+5:302020-03-22T01:58:13+5:30

लॉस एंजिलिस/ओस्लो : कोरोनामुळे जनजीवन ढवळून निघाले असून, जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा क्रीडा क्षेत्राला मोठा ...

Coronavirus: Demand for US, Norway to postpone the Olympics | Coronavirus : ऑलिम्पिक स्थगित करण्याची अमेरिका, नॉर्वेची मागणी

Coronavirus : ऑलिम्पिक स्थगित करण्याची अमेरिका, नॉर्वेची मागणी

Next

लॉस एंजिलिस/ओस्लो : कोरोनामुळे जनजीवन ढवळून निघाले असून, जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला असताना या व्हायरसवर पूर्ण नियंत्रण मिळवेपर्यंत टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी मागणी अमेरिका आणि नॉर्वेने केली आहे.
नॉर्वेच्या आॅलिम्पिक समितीने यासंदर्भात शुक्रवारी आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना पत्र लिहिले. या पत्रावर देशाच्या आॅलिम्पिक समितीच्या अध्यक्ष आणि महासचिवाची स्वाक्षरी आहे. पत्रात त्यांनी लिहिले, ‘कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर जागतिक स्तरावर मात करण्याबची धडपड सुरू आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईस्तोवर टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन करण्यात येऊ नये, असा आमचा आग्रह असेल.
आम्ही देशातील तसेच आंतरराष्टÑीय स्तरावरील जनतेच्या आरोग्याबाबत चिंताग्रस्त आहोत. खेळाडूंसाठी ही आव्हानात्मक वेळ आहे. सर्वच देशांनी क्रीडा आयोजन आणि सराव तसेच तयारीदेखील स्थगित केली आहे. अशावेळी आॅलिम्पिकचा विचार करणे योग्य होणार नाही, असेही पत्रात म्हटले आहे.
दुसरीकडे अमेरिकेच्या जलतरण महासंघाने अमेरिकन आॅलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समितीमार्फत टोकियो आॅलिम्पिक स्थगित करण्याची आयओसीकडे मागणी केली आहे. अमेरिकेच्या आॅलिम्पिक समितीचे सीईओ सारा हिर्शलॅन्ड यांना पाठविलेल्या विनंती पत्रात जलतरण महासंघाचे सीईओ टिम हिचे यांनी कोरोनामुळे टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन किमान वर्षभर लांबवीवर टाकण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
मायकेल फेल्प्स याला २८ पदके मिळवून देणारे कोच बॉब बोमॅन यांनीदेखील आॅलिम्पिक स्थगित करण्याची मागणी केली. त्यांनी देशातील जलतरण महासंघाच्या मागणीला स्वत:चा पाठिंबा दर्शविला आहे. खेळाडूंची कामगिरीच नव्हे तर त्यांची मानसिक स्थिती लक्षात घेता आॅलिम्पिकला स्थगिती देणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे बोमॅन यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

फ्रान्सच्या जलतरण संघटनेकडूनही मागणी
पॅरिस : अमेरिका आणि नॉर्वेतील जलतरण संघटनेच्या मागणीनंतर फ्रान्सच्या जलतरण महासंघाने देखील कोरोना व्हायरमुळे टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन स्थगित करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. फ्रान्सच्या जलतरण महासंघाने आपल्या कार्यकारी समितीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स केल्यानंतर सध्याची स्थिती आॅलिम्पिक आयोजनास अनुकूल नसल्याचे म्हटले आहे. आॅलिम्पिक आयोजन स्थगित करण्याबाबत विचार व्हायला हवा, असेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Coronavirus: Demand for US, Norway to postpone the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.