coronavirus: २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 03:21 AM2020-07-10T03:21:54+5:302020-07-10T03:23:04+5:30
अलीकडे जपान न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणात ७७ टक्के लोकांनी पुढीलवर्षी आॅलिम्पिकचे आयोजन होईल, असे वाटत नसल्याचे मत नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजकांना हे वक्तव्य करावे लागले.
टोकियो : कोरोनामुळे वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात आलेले टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन पुढच्या वर्षी २३ जुलैपासून निश्चितपणे होईल, असा आशावाद आयोजकांनी व्यक्त केला.
अलीकडे जपान न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणात ७७ टक्के लोकांनी पुढीलवर्षी आॅलिम्पिकचे आयोजन होईल, असे वाटत नसल्याचे मत नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजकांना हे वक्तव्य करावे लागले. केवळ १७ टक्के भागधारकांनी कोरोना संकटानंतरही टोकियो आॅलिम्पिक होतील, असा आशावाद व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)
मागच्या महिन्यात एका टीव्ही वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात ५१ टक्के लोकांनी नकारार्थी तर ४६ टक्के लोकांनी सकारात्मक मत नोंदवले होते.
टोकियो आॅलिम्पिकचे प्रवक्ते मासा ताकाया म्हणाले, ‘२३ जुलै २०२१ ला उद्घाटनाद्वारे आॅलिम्पिक सुरू करण्याची आमची योजना आहे.’ टोकियो शहरात गुरुवारी २२४ जण पॉझिटिव्ह आढळले. मागच्या आठवड्यापासून राजधानीत ही संख्या वाढतच आहे. (वृत्तसंस्था)