पाकला परिस्थितीचे आकलन करता आले नाही

By admin | Published: March 21, 2016 02:20 AM2016-03-21T02:20:22+5:302016-03-21T02:20:22+5:30

भारताची गेल्या १५ वर्षांतील कामगिरी बघितल्यानंतर मला शारजामध्ये जुन्या स्पर्धांमध्ये पाकने केलेल्या कामगिरीची आठवण झाली.

Could not understand the situation | पाकला परिस्थितीचे आकलन करता आले नाही

पाकला परिस्थितीचे आकलन करता आले नाही

Next

भारताची गेल्या १५ वर्षांतील कामगिरी बघितल्यानंतर मला शारजामध्ये जुन्या स्पर्धांमध्ये पाकने केलेल्या कामगिरीची आठवण झाली.
१९८०-९० च्या दशकांत विशेषत: शारजामध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवणारच असा आम्हाला विश्वास होता. गेल्या १५ वर्षांमध्ये भारतीय संघात तोच विश्वास झळकत आहे.
पाकिस्तानने कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवण्याच्या घटनेला जवळजवळ अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. आशिया कप २०१४ मध्ये हे घडले होते. पण, त्यानंतर भारताने आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावला आहे. सर्वोत्तम कामगिरी करीत असल्यामुळे भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरत आहे.
कोलकातामध्येही यापेक्षा वेगळे घडले नाही. युवी व कोहली यांच्यादरम्यान भागीदारी झाल्यानंतर भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. माझ्या मते १३०-१३५ धावांचे लक्ष्य असते तर भारतापुढे आव्हान निर्माण करता आले असते, पण ११८ धावांचे लक्ष्य फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर यजमान संघापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी पुरेसे नव्हते.
सामन्याची सुरुवातच पाकसाठी अनुकूल नव्हती. त्यांना परिस्थितीचे आकलन करता आले नाही. फिरकीपटू इमाद वसीमला वगळून त्यांना खेळपट्टीचे आकलन करता आले नसल्याचे स्पष्ट झाले. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर चार वेगवान गोलंदाजांना खेळविण्याची रणनीती समजली नाही. भारतीय संघात युवी, शिखर व सुरेश रैना या तीन डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश असल्यामुळे डावखुऱ्या फिरकीपटूला न खेळविण्याची रणनीती समजू शकतो.
विजय मिळवणाऱ्या संघात त्यांनी बदल करायला नको होता. महान खेळाडू इम्रानच्या बाजूला बसलो होतो. आफ्रिदीने आमिरचा स्पेल पूर्ण का केला नाही, असा प्रश्न इम्रानलाही पडला होता. आमिरला १३ व्या षटकांत पुन्हा गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. आफ्रिदीनेही चांगला मारा केला नाही. युवराजला कट शॉट खेळण्यास बाध्य करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याला बाद करण्याची संधी होती.
धोनीने आश्विनपेक्षा बुमराहवर विश्वास दाखविला. विजय मिळवल्यानंतर सर्व प्रश्न गौण ठरतात. धोनीला हा प्रश्न कुणी विचारणार नाही.एकूण विचार करता पाकिस्तानसाठी हा मानसिक प्रश्न आहे. आयसीसीच्या स्पर्धेमध्ये त्यांना पुन्हा एकदा भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मी सुरुवातीलाच शारजाचा उल्लेख केला आहे. भारताची मानसिकता त्या वेळच्या पाक संघाप्रमाणे आहे, तर पाकची मानसिकता त्या वेळच्या भारतीय संघाप्रमाणे आहे. (टीसीएम)



पाकिस्तानने स्थानिक क्रिकेटवर लक्ष पुरविणे आवश्यक आहे. पाकमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमधून दर्जेदार खेळाडू पुढे येतील, याबाबत विचार होणे आवश्यक आहे.

Web Title: Could not understand the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.