श्रेय हिंगीसलाच... बीबीसीचे ट्विट
By admin | Published: July 14, 2015 02:52 AM2015-07-14T02:52:46+5:302015-07-14T02:52:46+5:30
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससोबत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक कामगिरीचे
नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससोबत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक कामगिरीचे भारतासह जगभरात कौतुक होत आहे. असे आनंदाचे वातावरण असताना बीबीसीने मात्र नव्या वादाला जन्म घातलाय. त्यांनी आपल्या टिष्ट्वटर अकाउंटवर या विजयाचे श्रेय केवळ मार्टिना हिंगीसलाच दिले.
चषक पटकावल्यानंतर ब्रिटिश चॅनलने टिष्ट्वटमध्ये लिहिले होते, की‘हिंगीसने जिंकला
विम्बल्डन चषक’. त्यानंतर लगेच भारताच्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी
टिष्ट्वट केले. ही चूक सुधारून त्यांनी ‘बरोबरच सानिया मिर्झानेही!’ असे लिहिले. इराणींच्या या टिष्ट्वटनंतर सोशल नेटवर्किंग साईटवर ४११ लोकांनी टिष्ट्वट केले. त्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटने या टिष्ट्वटला टाइमलाइनवरून हटविले.
(वृत्तसंस्था)