IPL 2021 च्या प्रक्षेपणावर तालिबानची बंदी; चीअर लिडर्स अन् महिला प्रेक्षक हे महत्त्वाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 01:06 PM2021-09-20T13:06:47+5:302021-09-20T13:09:07+5:30
IPL Broadcast Ban In Afghanistan : तालिबानच्या राजवटीखाली असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर घालण्यात आलीये बंदी.
आयपीएल २०२१ च्या (IPL २०२१) उर्वरित दुसऱ्या टप्प्याची सुरूवात रविवारपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) करण्यात आली. आता आयपीएलच्या सामन्यांदरम्यान ठराविक प्रमाणात प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला आहे. भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात एकूण २९ सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. आता उर्वरित ३१ सामने दुबईमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण जग आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेत असताना मात्र अफगाणिस्तानमधील नागरिकांना आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेता येणार नाही. अफगाणिस्तानात आयपीएलच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे.
अफगाणिस्तानात आयपीएलच्या सामन्यांवर बंदी घालण्यामागचं कारण त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला कायदा असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार यात इस्लामला मान्य नसलेली दृष्य असल्याचं सांगत अफगाणिस्तानमध्ये आयपीएल २०२१ च्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली आहे. मॅचच्या दरम्यान चिअरलीडर्सचा डान्स आणि स्टेडिअममध्ये महिलांच्या उपस्थिचीचं कारण देत अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Afghanistan national will not broadcast the @IPL as usual as it was reportedly banned to live the matches resumed tonight due to possible anti-islam contents, girls dancing & the attendence of barred hair women in the by Islamic Emirates of the Taliban. #CSKvMIpic.twitter.com/dmPZ3rrKn6
— M.ibrahim Momand (@IbrahimReporter) September 19, 2021
पहिल्या सामन्यात चेन्नईचा विजय
आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात रविवारी चेन्नई सुपरकिंग्जनं (CSK) मुंबई इंडियन्सवर (MI) २० धावांनी विजय मिळवला. धोनी ब्रिगेडनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयासह गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे. नाबाद ८८ धावांची खेळी करणारा मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.