क्रिकेट सामना

By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:52+5:302015-08-20T22:09:52+5:30

भारताची सन्मानजनक मजल

Cricket match | क्रिकेट सामना

क्रिकेट सामना

Next
रताची सन्मानजनक मजल
दुसरी कसोटी : के. एल. राहुलचे शतक, भारत ६ बाद ३१९
कोलंबो : युवा सलामीवीर लोकेश राहुलचे शतक आणि कर्णधार विराट कोहली व रोहित शर्मा यांनी झळकविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध आजपासून खेळल्या जात असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद ३१९ धावांची सन्मानजनक मजल मारली. पहिल्या लढतीत पराभव स्वीकारणार्‍या भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी या लढतीत चांगली कामगिरी केली. कुमार संगकाराच्या निरोपाच्या कसोटी सामन्यात भारताच्या डावात राहुल (१०८), कोहली (७८) आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रोहित (७९) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणार्‍या भारताची एकवेळ २ बाद १२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर राहुल व कर्णधार कोहली यांनी तिसर्‍या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. कोहलीने १०७ चेंडूंमध्ये ८ चौकार व १ षटकाराच्या साह्याने ७८ धावांची खेळी केली. त्याआधी, सकाळच्या सत्रात धम्मिका प्रसादने दोन बळी घेत श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर मुरली विजय (०) आणि अजिंक्य रहाणे (४) यांना मोठी खेळी करता आली नाही. दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार्‍या विजयला पुनरागमनात चांगली कामगिरी करता आली नाही. रहाणे तिसर्‍या क्रमांकावर अपयशी ठरला. त्यानंतर दुष्मंता चामीराच्या पहिल्या षटकात राहुल सुदैवी ठरला. त्याचा उडालेला झेल गलीमध्ये तैनात जेहान मुबारकला टिपता आला नाही. दुसर्‍या टोकाकडून कोहली शानदार फलंदाजी करीत होता. उपाहारानंतर कोहली व राहुल यांनी शानदार फलंदाजी केली. विराटने ११ वे कसोटी अर्धशतक ६३ चेंडूंमध्ये पूर्ण केले. भारताने २८ व्या षटकात १०० धावांचा पल्ला ओलांडला. त्यानंतर राहुलनेही वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले.

Web Title: Cricket match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.