क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड विश्वविजयापासून वंचित
By admin | Published: February 14, 2015 06:03 PM2015-02-14T18:03:15+5:302015-02-14T18:03:15+5:30
क्रिकेटचा शोध लावणारा देश इंग्लंड, पहिला कसोटी खेळणारा देश इंग्लंड, पहिला वनडे खेळणारा देश इंग्लंड, पहिला ट्टेंटी-२0 खेळणारा देश इंग्लंड, पहिल्या तीन विश्वचषक स्पर्धेचा यजमान इंग्लंडच...
Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">विश्वास चरणकर, कोल्हापूर
क्रिकेटचा शोध लावणारा देश इंग्लंड, पहिला कसोटी खेळणारा देश इंग्लंड, पहिला वनडे खेळणारा देश इंग्लंड, पहिला ट्टेंटी-२0 खेळणारा देश इंग्लंड, पहिल्या तीन विश्वचषक स्पर्धेचा यजमान इंग्लंडच असे असताना इंग्लंड अजूनही पहिल्या विश्वविजयाच्या शोधात आहे. माईक डेनेसपासून अँड्रय़ू स्ट्रॉस यांना जे जमले नाही तो चमत्कार करण्याची जबाबदारी जन्माने आयरिश असलेल्या इयोन मोर्गनच्या कोवळय़ा खांद्यावर आली आहे.
विश्वचषक स्पर्धेचे सर्वाधिक चार वेळा यजमानपद भूषविण्याचा मान इंग्लंडकडे जातो. १९७५चा पहिला विश्वचषक त्यांनी भरविला. पाठोपाठ १९७९ आणि १९८३ असे सलग तीनदा ते यजमान होते. त्यानंतर १९९९ला पुन्हा त्यांना यजमानपदाचा सन्मान मिळाला. पण या चार वेळेला मायदेशात आणि इतर सहावेळेला परदेशात झालेल्या स्पर्धांमध्ये विश्वचषक उचलण्याचे भाग्य एकाही कर्णधाराच्या वाट्याला आले नाही. यापैकी तीनवेळा ते अंतिम फेरीत पोहचले, पण विजेतेपदाची हुलकाणीच मिळाली. ही सल गोर्या साहेबाच्या मनात काळय़ा काट्याप्रमाणे बोचत आहे.
१९७५च्या विश्वचषकात इंग्लंडने सेमीफायनलपर्यंत मजल मारली. तेथे त्यांन ऑस्ट्रेलियाने हरविले. पुढच्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली पण तेथेही वेस्ट इंडीजने त्यांचा स्वप्नभंग केला. १९८३च्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडीजने त्यांची वाट अडविली. इंग्लंडचा सर्वात जास्त जवळचा हुकलेला वर्ल्डकप म्हणजे १९८७ चा रिलायन्स वर्ल्डकप. कोलकात्यात झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांना केवळ सात धावांनी हरविले होते. १९९२ ला ते पुन्हा अंतिम फेरीत पोहचले पण इम्रान खानच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघाने त्यांना २२ धावांनी हरविले. यानंतर मात्र त्यांना उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाता आले नाहीे.
ईसीबीचे धाडसी निर्णय
च्जे आतापर्यंत झाले नाही ते यावेळी साध्य करायचे याचा चंग इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने खूप आधीपासून बांधला आहे. वनडे क्रिकेट हे तरुणांचे क्रिकेट आहे. म्हणून त्यांनी संघातील वयस्कर खेळाडूंना नारळ देण्यास सुरवात केली. २0१५च्या स्कॉडमध्ये पीटरसन बसत नव्हता म्हणून त्यांनी त्याला हटविले. याच्याही पुढे जावून धाडसी निर्णय घेताना त्यांनी कर्णधार अँलेस्टर कुकला संघातून हटविले.
च्कुक हा पारंपारिक पठडीतील क्रिकेटपटू, आधुनिक क्रिकेटमध्ये षटकागणिक डावपेच बदलावे लागतात, जरा ‘हटके’ विचार करावा लागतो. या कसोट्यांवर कुक कमी पडत होता म्हणून संघाची धुरा २८ वर्षीय इयोन मोर्गनच्या खांदय़ावर दिली. स्वभावाने शांत पण तितकाच धोरणी असलेला डावखुरा मोर्गन मधल्याफळीत फलंदाजी करतो. त्याच्यातील नेतृत्त्व गुण ईसीबीने ओळखले, आणि स्पर्धेपूर्वी दोन महिने त्याला कर्णधार केले.
आतापर्यंत झालेल्या दहाही विश्वचषकात इंग्लंड संघाने दहा कर्णधार पाहिले आहेत. एकाही कर्णधाराला विश्वचषकात दोनदा नेतृत्त्व करण्याची संधी मिळालेली नाही. कर्णधारांच्या या यादीत माईक डेनेस (१९७५), माईक बेअर्ले (१९७९), बॉब विलिस (१९८३), माईक गॅटिंग (१९८७), ग्रॅहम गुच (१९९२), माईक अँथरटन (१९९६), अँलेक स्टीवर्ट (१९९९), नासेर हुसेन (२00३), मायकेल वॉन (२00७) आणि अँड्रय़ू स्ट्रॉस (२0११) यांचा समावेश आहे.