Cristiano Ronaldo: Video: रोनाल्डोने चाहत्याचा तोडला फोन; दोन सामन्यांची बंदी आणि दंडात्कम कारवाई झाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:31 AM2022-11-24T09:31:12+5:302022-11-24T09:36:09+5:30

FIFA World Cup: या घटनेनंतर रोनाल्डोलाही वाईट वाटले आणि त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून माफी मागितली.

Cristiano Ronaldo: Ronaldo breaks fan's phone; Two-match ban and disciplinary action on him | Cristiano Ronaldo: Video: रोनाल्डोने चाहत्याचा तोडला फोन; दोन सामन्यांची बंदी आणि दंडात्कम कारवाई झाली...

Cristiano Ronaldo: Video: रोनाल्डोने चाहत्याचा तोडला फोन; दोन सामन्यांची बंदी आणि दंडात्कम कारवाई झाली...

googlenewsNext

FIFA World Cup: कतार देशात फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup) आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान, दिग्गज फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) मोठा झटका बसला आहे. रोनाल्डोला इंग्लंडच्या देशांतर्गत एफए चषक स्पर्धेत दोन सामन्यांची बंदी आणि दंड ठोठावण्यात आला आहे.

नेमकं काय कारण?
दिग्गज फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळतो. काही दिवसांपूर्वीच त्याने एक सामना गमावल्यानंतर बाहेर पडताना रागाच्या भरात व्हिडिओ काढणाऱ्या एका चाहत्याचा मोबाईल फोन तोडला होता. याप्रकरणी कारवाई करताना रोनाल्डोवर दंड आणि बंदी घालण्यात आली आहे.

बंदी विश्वचषकात लागू होईल?
द मिररच्या वृत्तानुसार, रोनाल्डोला 50,000 पौंड दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच एफए कपमधील दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. चांगली गोष्ट म्हणजे, ही बंदी विश्वचषकातील सामन्यांसाठी लागू होणार नाही. ही बंदी फक्त एफए टूर्नामेंट सामन्यांमध्येच राहील.

महत्त्वाच्या लढतीत युनायटेडचा पराभव 
या वर्षी एप्रिलमध्ये मँचेस्टर युनायटेड संघ एव्हर्टनविरुद्ध सामना खेळला होता. चॅम्पियन्स लीगमध्ये पात्र होण्यासाठी मँचेस्टर युनायटेडसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते, परंतु तसे होऊ शकले नाही. या सामन्यात एव्हर्टनकडून मँचेस्टर युनायटेडला दारुण पराभव पत्करावा लागला होता. 

मोबाईल फोडल्यानंतर माफी मागितली
या पराभवाच्या रागात रोनाल्डो आपल्या संघासह मैदान सोडत होता. सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे रोनाल्डो थोडासा लंगडत चालत होता. यादरम्यान रोनाल्डोने व्हिडिओ बनवणाऱ्या एका चाहत्याचा फोन तोडला. या घटनेनंतर रोनाल्डोलाही वाईट वाटले आणि त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून माफी मागितली. 

Web Title: Cristiano Ronaldo: Ronaldo breaks fan's phone; Two-match ban and disciplinary action on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.