क्रिस्टियानो रोनाल्डोचा शेवट सचिन तेंडुलकरप्रमाणे होणार?

By admin | Published: June 10, 2016 05:48 PM2016-06-10T17:48:04+5:302016-06-10T19:22:28+5:30

युरो चषकास आज (१० जून) पासून फ्राँसमध्ये सुरुवात होत आहे. आपल्याकडे फुटबॉल हा खेळ हॉकी, क्रिकेटप्रमाणे खेळत नसले तरी राज्यस्तरीय फुटबॉलचे सामने खेळले जातात

Cristiano Ronaldo's end will be like Sachin Tendulkar? | क्रिस्टियानो रोनाल्डोचा शेवट सचिन तेंडुलकरप्रमाणे होणार?

क्रिस्टियानो रोनाल्डोचा शेवट सचिन तेंडुलकरप्रमाणे होणार?

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० : युरो चषकास आज (१० जून) पासून फ्रान्समध्ये सुरुवात होत आहे. आपल्याकडे फुटबॉल हा खेळ हॉकी, क्रिकेटप्रमाणे खेळत नसले तरी राज्यस्तरीय फुटबॉलचे सामने खेळले जातात. परंतु, फुटबॉल चाहत्यांचं प्रमाण आपल्याकडे खूप आहे. सध्या चालू झालेल्या युरो कप स्पर्धेचा प्रभाव आपल्या येथील काही फुटबॉल प्रेमींमध्ये दिसून येत आहे. अनेक स्टार खेळाडू खेळतील त्यामधील एक क्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर असंख्य चाहते बनवले आहेत. जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. ३१ वर्षीय रोनाल्डोचा हा युरोकप शेवटचा ठरु शकतो. आतापर्यंत आपल्या खेळाच्या जोरावर त्याने अनेक विक्रम केले आहेत. यांनतरच्या स्पर्धेत तो खेळू शकेल असे वाटत नाही. भारतीय स्टार फलंदाज सचिन तेंडूलकरला आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दिच्या शेवटी विश्वचषक जिंकण्यात महत्वाची भुमीका बजावली होती. त्याचप्रमाणे क्रिस्टियानो रोनाल्डोच्या खेळाचा शेवटही सचिन प्रमाणेच होणार का ? 
 
५ फेब्रुवारी १९८५ रोजी पोर्तुगाल मधील फुंचल, मदीरा येथे क्रिस्टियानो रोनाल्डोचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला फुटबॉल खेळाची आवड. सध्या पोर्तुगाल संघाचा तो कर्णधार असून मैदानावर तो मुख्य स्ट्रायकरच्या भुमिकेत असतो. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रोनाल्ड रीगन यांच्या नावावरुन रोनाल्डोच्या आई बाबांनी त्याचे नाव रोनाल्डो ठेवलं. त्याचं पुर्ण नाव क्रिस्टियानो रोनाल्डो डॉस सैंटोस अवीयरो असं आहे. पोर्तुगालशिवाय तो स्थानिक फुटबॉल खेळताना रियल मद्रिदचे प्रतिनिधित्व करतो. आजतागत आतंरराष्ट्रीय स्पर्धेत त्याच्यानावावर ५८ गोलची नोंद आहे. रोनाल्डो तरुणांचा आवडता फुटबॉलपट्टू आहे.   
 
             
 
 
.
 
१२१ कोटी रुपयांचे घर : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्टियानो रोनाल्डो याने १९ ऑगस्ट २०१५ रोजी न्यूयॉर्कच्या फिफ्थ ॲव्हेन्यूच्या ट्रम्प टॉवरमध्ये १८.५ मिलियन डॉलर (सुमारे १२१ कोटी रुपये) मध्ये एक अपार्टमेंट विकत घेतले. यानंतर तो भविष्यामध्ये अमेरिकेत स्थायिक होईल, अशा चर्चेला उधाण आले. रोनाल्डोने ट्रम्पचा पार्टनर एलेसांद्रो पोर्टोकडून २५०९ फुटाचे हे अपार्टमेंट विकत घेतले आहे़. वास्तविकतेत रोनाल्डो आपला अधिकांश वेळ युरोपमध्येच घालवत असतो़ मात्र आता या निमित्ताने तो अमेरिकेतही आपला वेळ घालवेल, अशी अपेक्षा. 
 
                       
 
 
सार्वजनिक ठिकाणी लघुशंका : स्टार खेळाडू आणि वाद हे समीकरणच झाले आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो याने २ जून २०१५ रोजी सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याने चर्चेचा विषय बनला होता. फ्रान्स येथील एका हॉटेलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो याने मित्रांसोबत रात्रभर पार्टी केल्यानंतर पहाटेच्या सुमारास हे सर्वजण बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने रस्त्याच्या एका बाजूला पार्क करण्यात आलेल्या गाडीच्यामागे जाऊन लघुशंका केली. हे करत असताना त्याला येथील स्थानिक पोलिसांनी पकडले होते.  
 
 

Web Title: Cristiano Ronaldo's end will be like Sachin Tendulkar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.