राजकीय नेत्यांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 03:03 AM2017-12-25T03:03:34+5:302017-12-25T03:03:39+5:30
(ता. मुळशी) झालेल्या ६१ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून नामवंत मल्लांबरोबरच राजकीय नेत्यांची मांदियाळी राहिली.
प्रदीप पाटील
भूगाव : (ता. मुळशी) झालेल्या ६१ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून नामवंत मल्लांबरोबरच राजकीय नेत्यांची मांदियाळी राहिली.
सलग चार दिवस चाललेल्या विविध वजन गटातील कुस्त्यांचा समारोप होणार असल्यामुळे अंतिम लढतीसाठी मागील सलग तीनवर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेचा विजय चौधरी, हिंद केसरी विजेता योगेश बुचडे यांच्यासह अनेक नामवंत मल्ल आज उपस्थित होते. यामध्ये माजी कृषिमंत्री व महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट,आमदार संग्राम थोपटे, माजी खासदार विदुरा नवले, माजी खासदार अशोक मोहोळ, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, रामराजे निंबाळकर, अभिनेते मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी तांगडे, संदीप भोंडवे, स्वस्तिक चोंधे, राहुल शेडगे, अनिल पवार आदी उपस्थित होते. तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे हेही यावेळी उपस्थित होते.
याशिवाय मागील तीन दिवसात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. प्रास्ताविक कुस्ती स्पर्धेचे मुख्य आयोजक व जि.प. माजी गटनेते शांताराम इंगवले यांनी केले. महाराष्ट्र केसरी विजेत्या अभिजित कटके याला रोख १ लाख रुपये व जीप गाडी तसेच मानाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या किरण भगतला रोख पन्नास हजार रुपये व बुलेट गाडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.