केकेआरचे मुंबईपुढे १८८ धावांचे गंभीर लक्ष्य

By admin | Published: April 13, 2016 09:43 PM2016-04-13T21:43:07+5:302016-04-13T21:49:46+5:30

गौतम गंभीर(६४), मनिष पांडेनी(५२) आणि आंद्रे रसेलच्या(३६) फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने मुंबईकरासंमोर विजयसासाठी १८८ धावांचे गंभीर लक्ष ठेवले आहे.

A crucial target of 188 runs against KKR's Mumbai | केकेआरचे मुंबईपुढे १८८ धावांचे गंभीर लक्ष्य

केकेआरचे मुंबईपुढे १८८ धावांचे गंभीर लक्ष्य

Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १३ - गौतम गंभीर(६४), मनिष पांडेनी(५२) आणि आंद्रे रसेलच्या(३६) फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने मुंबईकरासंमोर विजयसासाठी १८८ धावांचे गंभीर लक्ष ठेवले आहे. केकेआरने निरधारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १८७ धावा केल्या. गौतम गंभीर आणि मनिष पांडेनी दुसऱ्या विकेटसाठी १० षटकात प्रतिषटक १० च्या सरासरीने १०० धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या झटपट वाढवली, सलामीवीर रॉबिन उथप्पा संघाच्या २१ धावा असताना ८ धावावर बाद झाला, त्याला मिशेल मॅक्लनघनने तंबूचा रस्ता दाखवला. त्यांनतर पांडे-गंभीर या जोडीने मुंबईकरांना चागंलेच झुंझवले. या दोघांनी ४ षटकार आणि ६ चौकर लगावले. एकेरी दुहेरी धावसंखेवर जास्त भर देत मुंबईच्या गोंलदाजावर दबाव निर्माण केला. १४ व्या षटकात हरभजनसिंहने पांडेला बाद करत ही जोडी फोडली. पांडे बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू फलंदाज रसेलने चौफेर फटेकेबाजी करत प्रेषकांचे मनेरंजन केले. हाणामारीच्या वेळी केकेआरने झटपट फलंदाज गमावल्यामुले २०० धावांचा टप्पा पार करु शकले नाहीत.
मुंबईकडून मिशेल मॅक्लनघनने ४ षटकात २५ धावांच्या मोबदल्यात २ फलंदाजांना बाद केले. हरभजन आणि पांड्याने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
उभय संघ - 
कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, युसूफ पठाण, कुलदीप यादव, मनीष पांडे, जॉन हेस्टिंग्ज, आंद्रे रसेल, ब्रॅड हॉग, कॉलिन मन्रो, सूर्यकुमार यादव.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, अंबाती रायुडू, जोस बटलर, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, मिशेल मॅक्लनघन, हार्दिक पंड्या, जे. सुचित, 
 

Web Title: A crucial target of 188 runs against KKR's Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.