नायक यांच्या वर्ल्ड रेकॉर्डची उत्सुकता मार्शल आर्ट्स : तीन मिनिटांत तीन विक्रमांचा दावा

By admin | Published: June 25, 2015 11:51 PM2015-06-25T23:51:13+5:302015-06-25T23:51:13+5:30

नवी मुंबई : शहरातील एक उत्तम क्रीडापटू म्हणून ओळखल्या जाणार्‍या बी. बी. नायक यांनी बुधवारी ऐरोलीतील गुरुद्वारात एकाच दिवशी तीन प्रकारचे विश्वविक्रम केला असल्याचा दावा केला आहे. एका मिनिटात त्यांनी मार्शल आर्ट प्रकारातील किक, उठक - बैठक व पाय मागे पुढे घेण्याचा (मावाशे किक) विक्रम केला. नायक यांनी यापूर्वीही लिम्का बुक आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेक विश्वविक्रमांची नोंद केली आहे.

Curiosity for Nayak's world record Martial arts: Three records claimed in three minutes | नायक यांच्या वर्ल्ड रेकॉर्डची उत्सुकता मार्शल आर्ट्स : तीन मिनिटांत तीन विक्रमांचा दावा

नायक यांच्या वर्ल्ड रेकॉर्डची उत्सुकता मार्शल आर्ट्स : तीन मिनिटांत तीन विक्रमांचा दावा

Next
ी मुंबई : शहरातील एक उत्तम क्रीडापटू म्हणून ओळखल्या जाणार्‍या बी. बी. नायक यांनी बुधवारी ऐरोलीतील गुरुद्वारात एकाच दिवशी तीन प्रकारचे विश्वविक्रम केला असल्याचा दावा केला आहे. एका मिनिटात त्यांनी मार्शल आर्ट प्रकारातील किक, उठक - बैठक व पाय मागे पुढे घेण्याचा (मावाशे किक) विक्रम केला. नायक यांनी यापूर्वीही लिम्का बुक आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेक विश्वविक्रमांची नोंद केली आहे.
बी. बी. नायक यांनी एका मिनिटात मार्शल आर्ट प्रकारातील २५० किक मारल्या. त्यानंतर एका मिनिटात ७५ उठक - बैठक (नॉर्मल स्कॉट) मारल्या तसेच एका मिनिटात ७१ वेळा पाय मागे पुढे (मोस्ट अल्टरनेट स्कॉट थ्रस्ट इन मिनिट) करण्याचा विक्रम केला. या प्रसंगी राज्याचे प्रमुख क्रीडा मार्गदर्शक जगदीश राजेशिर्वे, आय. सी. एल. महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक मानसी मदारे, परवंदरीएस सायना तसेच शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत हा विश्वविक्रम करण्यात आला.
दरम्यान या विक्रमांची माहिती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यासाठी पाठविला आहे. यापूर्वीही एका व्यक्तीने एका मिनिटात ६८ वेळा पाय मागे पुढे करण्याचा विक्रम केला होता. ५० वर्षीय नायक हे रेल्वे सुरक्षा दल व मध्य रेल्वेच्या शक्ती टीमचे कमांडो प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी ७ गिनीज व १२ लिम्का रेकॉर्ड केले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Curiosity for Nayak's world record Martial arts: Three records claimed in three minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.