‘राष्ट्रकुल’च्या शासकीय विदेशवारीत ‘कपात’; अधिकारी, नातेवाईकांवर उधळपट्टी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:16 AM2018-03-22T00:16:10+5:302018-03-22T00:16:10+5:30
आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे पुढील महिन्यात ४ एप्रिलपासून आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर होणाऱ्या खर्चात कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. क्रीडा मंत्रालय खेळाडूंसोबत जाणा-या अधिका-यांच्या पथकास कात्री लावणार असल्याने अधिकारी आणि खेळाडूंचे कुटुंबीय शासकीय खर्चाने विदेशवारी करू शकणार नाहीत.
नवी दिल्ली: आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे पुढील महिन्यात ४ एप्रिलपासून आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर होणाऱ्या खर्चात कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. क्रीडा मंत्रालय खेळाडूंसोबत जाणा-या अधिका-यांच्या पथकास कात्री लावणार असल्याने अधिकारी आणि खेळाडूंचे कुटुंबीय शासकीय खर्चाने विदेशवारी करू शकणार नाहीत.
राष्ट्रकुलसाठी २२२ खेळाडू तसेच १०६ अधिका-यांचे पथक पाठविण्याची शिफारस भारतीय आॅलिम्पिक संघटनेने क्रीडा मंत्रालयाकडे केली. यादीला क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी अद्याप मंजुरी दिली नाही. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रानुसार १०६ अधिकाºयांंमध्ये ५७ प्रशिक्षक, १९ मॅनेजर आणि ४१ सपोर्ट स्टाफचा समावेश असून यातील ४१ नावांची समीक्षा होईल. त्यातील २० नावे गळण्याची दाट शक्यता आहे. अंतिम यादी एक - दोन दिवसात निश्चित होईल, मात्र यंदा शासकीय खर्चाने कुणी अधिकारी आणि खेळाडूंचे नातेवाईक विदेशवारी करू शकणार नाहीत, हे ठरले आहे.
क्रीडा मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, याआधी अनेक अधिकारी व नातेवाईक शासकीय खर्चाने प्रवास करायचे. क्रीडा ग्राममध्ये त्यांना प्रवेश नसायचा, त्यामुळे खेळाडूंची ते काय मदत करणार? याशिवाय दिग्गज खेळाडू आपल्या नातेवाईकांना मेंटॉर किंवा मॅनेजर बनवून प्रवास घडवून आणायचे. अशा अनेक तक्रारी मिळाल्यानंतर उपरोक्त निर्णय घेण्यात आला. शासकीय खर्चाचा दुरुपयोग होऊ नये व खेळाडूंवर फोकस करता यावा, ही यामागील भूमिका आहे.