CWG 2022:ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव, भारतीय महिला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 12:50 PM2022-08-06T12:50:04+5:302022-08-06T12:52:56+5:30

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला.

CWG 2022 Australia's women's hockey team defeated India 3-0 in a shoot-out in semi final match | CWG 2022:ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव, भारतीय महिला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर

CWG 2022:ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव, भारतीय महिला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर

Next

बर्गिंहॅम : सध्या जगभर राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मुळे खेळमय वातावरण झाले आहे. इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा (Indian Hockey Team) उपांत्यफेरीत (Semi Final) पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने शूट आऊटमध्ये भारतीय संघाचा ३-० ने पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ सलग पाचव्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला असला तरी संघाला कांस्य पदक पटकावण्याची संधी असणार आहे.

शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियाने मिळवला विजय 
खरं तर हा सामना सर्वप्रथम १-१ च्या बरोबरीत समाप्त झाला होता. यानंतर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी शूट आऊट सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३-० ने मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या पराभवामध्ये पंचाचा देखील मोठा वाटा राहिला. शूट-आऊटमध्ये भारताने पहिला गोल वाचवला होता, पण नंतर वेळ सुरूच झाली नसल्याचे सांगण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाला आणखी एक संधी देण्यात आली. यानंतर भारतीय संघ पिछाडीवर गेला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या हाफपर्यंत भारतावर १-० अशी आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाकडून हा एकमेव गोल रेबेका ग्रेनर हिने १० व्या मिनिटाच केला. मात्र यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने पहिला गोल केला. भारताच्या वंदना कटारियाने गोल करून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली होती मात्र शूट-आऊटमध्ये भारताचा पराभव झाला. २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत वंदनाने हा चौथा गोल केला आहे. 

 

Web Title: CWG 2022 Australia's women's hockey team defeated India 3-0 in a shoot-out in semi final match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.