Shiva Thapa, CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत रंगला India vs Pakistan सामना; बॉक्सर शिवा थापाने पाकिस्तानी खेळाडूला धु धु धुतला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 05:57 PM2022-07-29T17:57:44+5:302022-07-29T17:58:03+5:30
Commonwealth Games 2022, Shiva Thapa : राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) असा सामना पाहायला मिळाला.
Commonwealth Games 2022, Shiva Thapa : राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) असा सामना पाहायला मिळाला. भारताचा बॉक्सर शिवा थापा ( Shiva Thapa) याने ६३.५ किलो गटातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा ५-० असा पराभव केला. शिवाने पाकिस्तानी बॉक्सरला डोकं वर काढण्याची एकही संधी दिली नाही आणि त्या धु धु धुवत सहज बाजी मारली. पुढील सामन्यात त्याच्यासमोर २०२१च्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या रिसे लींच ( स्कॉटलंड) याचे आव्हान आहे.
२८ वर्षीय शिवाच्या नावावर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील १ सुवर्ण ( २०१३), दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं आहेत. त्याने सुरेख पंच मारताना पाकिस्तानी बॉक्सरला हतबल केले. त्याने २०१५च्या जागतिक स्पर्देत कांस्यपदकाची कमाई केली आहे.
.@shivathapa advances to R16🥊
— Boxing Federation (@BFI_official) July 29, 2022
Former Asiad gold winner gets off to a strong start to his #CWG2022 campaign with a dominating 5️⃣-0️⃣win against Baloch Suleman of 🇵🇰 .
Kudos on the win! 💪👏😍
#Commonwealthgames
#B2022
#PunchMeinHainDum 2.0 pic.twitter.com/IVyKWqUzz5
- टेबल टेनिस महिला सांघिक गट - भारताचा मनिका बात्राचा ११-५, ११-३, ११-२ असा दक्षिण आफ्रिकेच्या मुश्फीक कलामवर विजय
- Lawn Bowls मध्ये भारताच्या तानिया चौधरीला १०-२१ अशा फरकाने स्कॉटलंडच्या डी हॉगनकडून पराभव पत्करावा लागला. पुरुष गटातही भारताला न्यूझीलंडकडून ६-२३ अशी हार मानावी लागली.
- Cycling Men's Team Pursuit गटात भारताने ४००० मीटर पात्रता स्पर्धेत ४:१२.८६५ सेकंदाची वेळ नोंदवली
- टेबल टेनिस महिला सांघिक गटात भारताची दणक्यात सुरूवात झाली. त्यांनी ३-० अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेवर मात केली.
- Swimming Men's 100m Backstroke Heats: भारताच्या श्रीहरी नटराजने पात्रता फेरीत ५५.६८ सेकंदाची वेळ नोंदवरून पाचव्या स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला