' दंगल गर्ल्स ' फोगट भगिनींना राष्ट्रीय कुस्ती शिबीरामधून डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 06:01 PM2018-05-17T18:01:56+5:302018-05-17T18:01:56+5:30

आपल्यावर आधारीत सिनेमा आल्यावर फोगट भगिनींना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर राहत नसल्याचे बऱ्याच जणांनी म्हटले.

'Dangle Girls' Phogat sisters dropped From National Wrestling Camp | ' दंगल गर्ल्स ' फोगट भगिनींना राष्ट्रीय कुस्ती शिबीरामधून डच्चू

' दंगल गर्ल्स ' फोगट भगिनींना राष्ट्रीय कुस्ती शिबीरामधून डच्चू

googlenewsNext
ठळक मुद्देयावेळी जर त्यांना राष्ट्रीय शिबीरामधून डच्चू देण्यात आल्यामुळे त्यांना आगामी आशियाई स्पर्धेत बहुतेक खेळता येणार नाही.

नवी दिल्ली : ज्यांच्यावर बॉलीवूडवमधील एक सिनेमा बनवण्यात आला, आमीर खानने त्या सिनेमात काम केलं, अशा' दंगल गर्ल्स ' फोगट भगिनींना राष्ट्रीय शिबीरामधून डच्चू देण्यात आला आहे.

आपल्यावर आधारीत सिनेमा आल्यावर फोगट भगिनींना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर राहत नसल्याचे बऱ्याच जणांनी म्हटले. कुस्ती प्रशासनाला काही वेळा या भगिनींनी व्यवस्थित उत्तरेगी दिली नव्हती. त्यामुळे बेशिस्त फोगट भगिनींना राष्ट्रीय शिबीरामध्ये सामील न करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे.

फोगट भगिनींचे भविष्यात काय होऊ शकते...
राष्ट्रीय शिबीरामधून भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीचे संघ निवडले जातात. त्यामुळे यावेळी जर त्यांना राष्ट्रीय शिबीरामधून डच्चू देण्यात आल्यामुळे त्यांना आगामी आशियाई स्पर्धेत बहुतेक खेळता येणार नाही. त्यांचा बेशिस्तपणा असाच कायम राहीला तर त्यांना मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांनाही मुकावे लागेल.

महासंघाच्या अध्यक्षांचे म्हणणे काय...
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, " जेव्हा एखाद्या खेळाडूची शिबीरासाठी निवड केली जाते तेव्हा त्यांना आपली उपस्थिती कळवायची असते. यासाठी खेळाडूंना तीन दिवसांचा अवधी दिला जातो. या तीन दिवसांमध्ये फोगट भगिनींनी महासंघाला आपल्या अनुपस्थितीबाबत काहीही कळवले नाही. त्यांनी आपल्या प्रशिक्षकांनाही याबाबत काही सांगितले नाही. त्यामुळे त्यांची शिबीरासाठी निवड केली गेली नाही. "

Web Title: 'Dangle Girls' Phogat sisters dropped From National Wrestling Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा