डॅनियल व्हिटोरीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
By admin | Published: March 31, 2015 10:39 AM2015-03-31T10:39:40+5:302015-03-31T10:40:07+5:30
न्युझीलंड संघातील महान फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
ऑकलंड, दि. ३१ - विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या न्युझीलंड संघातील महान फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेला न्युझीलंडचा संघ आज मायदेशी परतला असता चाहत्यांनी खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. त्याचवेळी व्हिटोरीने आपण आप्लाय १८ वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा करत असल्याचे जाहीर केले.
'विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सामना हा माझ्यासाठी शेवटचा सामना होता. माझ्या कारकिर्दीचा शेवट उत्तम झाल्याने मी समाधानी आहे', असे ३६ वर्षीय व्हिटोरीने सांगितले. यावेळी त्याने कर्णधार ब्रँडन मॅकलम व प्रशिक्षक माईक हसन यांचेही आभार मानले.
आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीच व्हिटोरीने आत्तापर्यंत एकदिवसीय, कसोटी आणि टी-ट्वेन्टी सामन्यांमध्ये एकूण ७०५ बळी टिपले आहेत. त्याचा आयसीसीच्या सर्वोत्तम एकदिवसीय संघातही समावेश करण्यात आला आहे