डेअरडेव्हिल्स पुण्याचे समीकरण बिघडविणार?

By admin | Published: May 12, 2017 01:02 AM2017-05-12T01:02:15+5:302017-05-12T01:02:15+5:30

आयपीएल प्ले-आॅफच्या शर्यतीबाहेर पडलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आज शुक्रवारी घरच्या मैदानावर विजय नोंदवित रायजिंग पुणे

Daredevils will spoil the equation of Pune? | डेअरडेव्हिल्स पुण्याचे समीकरण बिघडविणार?

डेअरडेव्हिल्स पुण्याचे समीकरण बिघडविणार?

Next

नवी दिल्ली : आयपीएल प्ले-आॅफच्या शर्यतीबाहेर पडलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आज शुक्रवारी घरच्या मैदानावर विजय नोंदवित रायजिंग पुणे सुपरजायंटचे समीकरण बिघडविण्याची संधी आहे.
डेअरडेव्हिल्सला अखेरचे दोन्ही सामने कोटलावर खेळायचे आहेत. दोन्ही सामने जिंकून प्रतिष्ठा कायम राखण्याचा दिल्लीचा निर्धार आहे. ग्रीनपार्कवर काल गुजरातवर दोन गड्यांनी विजय मिळविल्याने दिल्लीचा आत्मविश्वासही उंचावला. कालच्या विजयासह १२ सामन्यांत १० गुणांसह हा संघ सहाव्या स्थानावर आला. झहीरच्या नेतृत्वाखालील हा संघ आता पुढील दोन्ही सामन्यांत कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे.
दुसरीकडे पुणे संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा राहील. पुण्याचे १२ सामन्यांत १६ गुण असल्याने केवळ प्ले आॅफमध्ये स्थान पटकविण्याचेच नव्हे तर अव्वल दोन संघात स्थान मिळविण्याचेहीस्वप्न बाळगले आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील पुण्याने मागच्या आठपैकी सात सामन्यांत विजय नोंदविला असल्याने कोटलावर दिल्लीच्या उणिवांचा लाभ घेत चित्र स्पष्ट करण्याच्या निर्धाराने हा संघ खेळेल.
दिल्लीचे फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरले. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन गुजरात लायन्सविरुद्ध दमदार खेळले पण नंतर दोन्ही सामन्यात अपयशी ठरले होते. कोरी अँडरसन आणि करुन नायरदेखील कामगिरीत सातत्य राखू शकले नाहीत. श्रेयस अय्यरने मात्र ग्रीनपार्कवर धडाकेबाज खेळी केली. गोलंदाजीत झहीर, शमी, पॅट कमिन्स आणि अमित मिश्रासारखे सरस गोलंदाज असले तरी दिल्लीचा मारा कमकुवत वाटतो.
पुणे संघाकडून युवा राहुल त्रिपाठी आणि कर्णधार स्मिथ याने संघासाठी नियमित योगदान दिले तर बेन स्टोक्स हा गेल्या काही सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकला. महेंद्रसिंग धोनी हा देखील सुरुवातीच्या अपयशानंतर फॉर्ममध्ये आला आहे. गोलंदाजीत या संघाकडे जयदेव उनाडकट, द. आफ्रिकेचा इम्रान ताहिर आणि स्टोक्स हे प्रभावी मारा करणारे खेळाडू आहेत. ताहिरच्या अनुपस्थितीतफिरकी विभागाची जबाबदारी अ‍ॅडम झम्पा तसेच वॉशिंग्टन सुंदर हे सांभाळू शकतात. उनाडकटने हैदराबादविरुद्ध पाच गडी बाद केले होते. या कामगिरीची दिल्लीविरुद्ध पुनरावृत्ती व्हावी, असे कर्णधार स्मिथला वाटत असावे. (वृत्तसंस्था)

Web Title: Daredevils will spoil the equation of Pune?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.