डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड, गंभीरला टाकलं मागे
By admin | Published: April 17, 2017 11:16 PM2017-04-17T23:16:45+5:302017-04-17T23:16:45+5:30
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतकं ठोकण्याचा पराक्रम त्याने केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 17 - सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतकं ठोकण्याचा पराक्रम त्याने केला. किंग्ज इलेव्हन पंजाबविरूद्ध आज झालेल्या सामन्यात वॉर्नरने 54 चेंडूत तडाखेबंद 70 धावांची नाबाद खेळी केली.
आयपीएलमध्ये वॉर्नरने आतापर्यंत 34 अर्धशतकं ठोकली आहेत. त्यासाठी तो 105 सामने खेळला आहे. यापुर्वी हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरच्या नावावर होता. गंभीरने आतापर्यंत 137 सामन्यांमध्ये 33 अर्धशतकं ठोकली आहेत.
वॉर्नरच्या या खेळीच्या जोरावर हैदराबादने पंजाबला 160 धावांचं लक्ष्य दिलं. नमन ओझासोबत वॉर्नरने 60 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.