‘दव’ फॅक्टर निर्णायक ठरला

By admin | Published: April 2, 2016 01:19 AM2016-04-02T01:19:30+5:302016-04-02T01:19:30+5:30

भारताला उपांत्य फेरीत पराभव का स्वीकारावा लागला, याचे निश्चित एक कारण देणे कठीण आहे. भारताने नाणेफेक गमविल्यानंतर ‘दव’ हा घटकही महत्त्वाचा ठरला.

The 'daw' factor was the decisive factor | ‘दव’ फॅक्टर निर्णायक ठरला

‘दव’ फॅक्टर निर्णायक ठरला

Next

- वसिम अक्रम लिहितो़...

भारताला उपांत्य फेरीत पराभव का स्वीकारावा लागला, याचे निश्चित एक कारण देणे कठीण आहे. भारताने नाणेफेक गमविल्यानंतर ‘दव’ हा घटकही महत्त्वाचा ठरला. दवामुळे फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवण्यात अडचण भासते, आणि खेळपट्टीकडूनही गोलंदाजांना काही मदत मिळत नव्हती.
वेगवान गोलंदाजांनाही अडचण भासत असल्यामुळे त्यांनाही काही करता येत नव्हते. रसेल व सिमन्सने षटकार ठोकण्यास प्रारंभ केल्यानंतर विंडीजला रोखणे कठीण होते.
कुणालाच काही करता येत नव्हते. भारताने १९२ धावांची मजल मारल्यानंतर प्रत्येकाला ही धावसंख्या पुरेशी वाटत होती आणि लढत एकतर्फी होणार असल्याची चर्चा होती. विंडीज संघ त्यामुळेच वेगळा ठरतो. विंडीजच्या खेळाडूंमध्ये नैसर्गिक आक्रमकता असल्यामुळे त्याला लक्ष्य गाठता आले. भारताने केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही, हे यजमान संघाचे दुर्दैव. आयपीएल स्पर्धेदरम्यान विंडीजच्या खेळाडूंना वानखेडेवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी त्याचा लाभ घेतला. काही लोक भारतीय संघाला १०-१५ धावा कमी पडल्याची चर्चा करीत आहेत. दव असताना अशा प्रकारच्या खेळपट्टीवर कुठल्याच गोलंदाजाला काही करता येत नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. चेंडूवर पकड मिळवणे महत्त्वाचा घटक होता. चेंडू हातातून निसटत होता. वेगवान गोलंदाजांना केवळ स्लोअर वनचा वापर करता आला असता. बुमराहने तेच केले, पण काही वेळानंतर स्लोअर वन चेंडूलाही विंडीजच्या फलंदाजांनी स्टँडमध्ये भिरकावले. आजच्या आ धुनिक काळातही दवावर मात करण्यासाठी कुठल्या प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, याचे आश्चर्य वाटते. दवावर नियंत्रण राखण्यासाठी स्पे्रचा वापर करता आला असता. (टीसीएम)

Web Title: The 'daw' factor was the decisive factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.