दिवसाखेर भारत १ बाद ७१
By admin | Published: January 7, 2015 09:48 AM2015-01-07T09:48:07+5:302015-01-07T12:22:23+5:30
सिडनी कसोटीच्या दुस-या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या ५७२ धावांचा पाठलाग करताना भारताची स्थिती १ बाद ७१ अशी असून रोहित शर्मा ४० तर लोकेश राहुल ४० धावांवर खेळत आहेत.
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ७ - सिडनी कसोटीच्या दुस-या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या ५७२ धावांचा पाठलाग करताना भारताची स्थिती १ बाद ७१ अशी असून रोहित शर्मा ४० तर लोकेश राहुल ४० धावांवर खेळत आहेत. सलामीचा फलंदाज मुरली विजय स्टार्कच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला.
फलंदाजांनी दमदार खेळी केल्याने ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारत पहिला डाव ५७२ धावांवर घोषित केला. स्मिथ (११७), मार्श (७३) आणि बर्न्स ( ५८) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ५ गडी गमावत ऑस्ट्रेलियाने ५७२ धावा केल्या. हॅडिन (९) व हॅरिस (२५) खेळत असताना ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला. शमीने ३ तर यादव व अश्विनने प्रत्येकी १ बळी टिपला.
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाने २ गडी गमवत ३४८ धावा केल्या होत्या. दुस-या दिवशी कर्णधार स्मिथने शतक झळकावून तर मार्श व बर्न्सने शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला ५००चा टप्पा पार केला. भारतीय गोलंदाजांचा त्यांच्यासमोर काहीच टिकाव लागला नाही.