द्रोणाचार्य पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:15 PM2020-08-28T23:15:52+5:302020-08-28T23:23:22+5:30
पुरुषोत्तम राय यांना शनिवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्तानं द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरविण्यात येणार होतं.
ट्रॅक अँड फिल्डमधील प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांना शनिवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्तानं द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरविण्यात येणार होतं. पण, शुक्रवारी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
''ते आम्हाला सोडून गेले. सायंकाळी त्यांना वेदना होऊ लागल्या होत्या आणि त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये त्यांना पलंगावर झोपवण्यात आले आणि काही वेळातच त्यांचे निधन झाले,''असे त्यांची पत्नी अॅनी राय यांनी सांगितले. सायंकाळी 8.30 वाजता त्यांचे निधन झाले. भारतीय संघाचा माजी कर्णधार ज्युड फेलीस्क ( द्रोणाचार्य पुरस्कार) आणि माजी बॅडमिंटनपटू तृप्ती मुर्गुंदे ( ध्यान चंद पुरस्कार) यांच्यासह 80 वर्षीय पुरुषोत्तम यांचा शनिवारी सक्तार होणार होता.
पुरुषोत्तम यांनी मार्गदर्शन केलेल्या रोसा कुट्टी, एमके आशा आणि प्रमिला ऐयप्पा यांनी 2000च्या सीडनी ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलं होतं.