डिव्हिलियर्सचा विश्वविक्रम!

By admin | Published: January 19, 2015 03:19 AM2015-01-19T03:19:50+5:302015-01-19T03:19:50+5:30

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने रविवारी धावांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या ३१ चेंडूंत शतक ठोकत आंतरराष्ट्रीय

De Villiers World Record! | डिव्हिलियर्सचा विश्वविक्रम!

डिव्हिलियर्सचा विश्वविक्रम!

Next

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने रविवारी धावांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या ३१ चेंडूंत शतक ठोकत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचला. त्याचे हे सर्वांत वेगवान शतक ठरले. वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डिव्हिलियर्सने ही विक्रमी खेळी केली. एवढेच नव्हे, तर सामन्यात त्याने अवघ्या १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर गोलंदाजांची धुलाई करीत त्याने ३१ चेंडूंत शतकही गाठले.
सर्वांत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम याआधी न्यूझीलंडच्या कोरी अ‍ॅँडरसन याच्या नावावर होता. त्याने गेल्या वर्षी जानेवारीत वेस्ट इंडीजविरुद्धच क्विन्सटाऊनमध्ये ३६ चेंडूंत शतकी दणका दिला होता. कोरीने धुवाधार खेळी करीत पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडला होता. आफ्रीदीचा हा विक्रम तब्बल १६ वर्षे कायम राहिला होता. कोरी अ‍ॅँडरसनचा विक्रम मात्र एक वर्ष १८ दिवसच टिकला. त्याच्यापेक्षाही तडफदार फलंदाजी करीत डिव्हिलियर्सने हा विक्रम आपल्या नावे केला.
दक्षिण आफ्रिकेकडून सर्वांत वेगवान शतक झळकविण्याचा विक्रम मार्क बाउचर याच्या नावावर होता. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध २००६ मध्ये ४४ चेंडूंत शतक पूर्ण केले होते. बाउचरचा हा विक्रम आता सर्वसाधारण यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अशाप्रकारे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिफन फलंदाजांच्या नावावर नोंदवला गेला आहे. टी-२० मध्ये रिचर्ड लेवीने ४५ चेंडूंत शतक झळकविले होते. कसोटी सामन्यातील सर्वांत वेगवान शतकाचा विक्रम संयुक्तरीत्या वेस्ट इंडीजच्या व्हिव रिचर्ड्स आणि पाकिस्तानच्या मिसबाह उल हक (दोघेही ५६ चेंडूंत) यांच्या नावावर आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: De Villiers World Record!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.