देबोराह डायस ठरली ‘गोल्डन वूमन’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 08:12 PM2018-10-15T20:12:23+5:302018-10-15T20:13:20+5:30

आयएफबीबी डायमंड शरीरसौष्ठव स्पर्धेत शानदार प्रदर्शन

Deborah Dies become 'Golden Woman' | देबोराह डायस ठरली ‘गोल्डन वूमन’

देबोराह डायस ठरली ‘गोल्डन वूमन’

googlenewsNext
ठळक मुद्देगोमंतकीय महिला शरिरसौष्ठवपटूने या गटात मिळवलेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.

मडगाव : मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयएफबीबी डायमंड चषक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात गोव्यातर्फे प्रतिनिधीत्व करणाºया देबोराह अलेरा डायस हिने महिलांच्या बिकिनी गटात सुवर्णपदक पटकाविले. गोमंतकीय महिला शरिरसौष्ठवपटूने या गटात मिळवलेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. आपण सुवर्णपदक प्राप्त करणार असा विश्वास तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला होता. 
अंधेरी येथील होली फॅमिली स्कूल मैदान येथे ही स्पर्धा सुरू आहे. देबोराह अलेरा डायस ही बिकीनी गटात भारतीय संघातून या स्पर्धेत सहभागी  झालेली गोव्याची एकमेव स्पर्धक आहे. विशेष म्हणजे राज्य पातळीवर तिने कोणत्याही मोठ्या कामगिरीची नोंद केलेली नाही. प्रथमच ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करीत आहे. स्पर्धेत तिने अंतिम फेरीतही प्रवेश केला. 


 आके-मडगाव येथील रहिवासी असलेली  देबोराह डायस ही इन्फिनीटी जिममध्ये सराव करते. तिला गोवाशरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष संजय रायकर हे मागदर्शन करतात. तसेच खुशाली विर्डिकर व गोविंद लोटलीकर यांचे प्रशिक्षणही तिला लाभले आहे. 
या स्पर्धेत मंगोलीया, तुर्क मिनीस्तान, नेपाळ, मालदीवसह ४० देशांतील आघाडीचे स्पर्धक सहभागी झाले आहे. स्पर्धेचे आयोजन अखिल भारतीय बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशनने विश्व बॉडीबिल्डिंग  फेडरेशनच्या मान्यतेखाली केले होते.

Web Title: Deborah Dies become 'Golden Woman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.