सरिताविरुद्धचा निर्णय निराशाजनक ठरला, भारतीय प्रशिक्षक शिव सिंग यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 04:35 AM2018-11-20T04:35:30+5:302018-11-20T04:35:42+5:30
भारताच्या साविटी बुराला (७५ किलो) येथे सुरू असलेल्या दहाव्या एआयबीए महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये सोमवारी एलबिएटा वोजसिकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
नवी दिल्ली : भारताच्या साविटी बुराला (७५ किलो) येथे सुरू असलेल्या दहाव्या एआयबीए महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये सोमवारी एलबिएटा वोजसिकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे यजमान देशाच्या दुसऱ्या बॉक्सरला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. रविवारी एल. सरिता देवीला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दोन्ही लढतींमध्ये निकाल सर्वसंमतीने झाले नाही. दोन्ही खेळाडूंना २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही खेळाडू रिंगमध्ये पडल्यानंतर रेफरीने काऊंटिंगला सुरुवात केली होती.
साविटीने पराभवानंतर प्रसारमाध्यमांसोबत चर्चा केली नाही. प्रशिक्षक शिव सिंग म्हणाले, ‘प्रतिस्पर्धी बॉक्सर तिचा ठोसा योग्य लागल्याचे दाखवित होती. तसेच ती धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न करीत होती. गुण परिक्षकांच्या निर्णयानंतर मिळतात.’ सिंग पुढे म्हणाले, ‘दोघींमध्ये एक समान बाब होती. ज्यावेळी सरिताची काऊंटिंग होत होती त्यावेळी प्रतिस्पर्धी खेळाडू तिला सावरण्यासाठी आली, पण जर ठोसा लागला असता तर ती पुढे आली नसती. तुम्हालाही दिसले असेल की तिचा ठोसा लागला नसतानाही रेफरीने गणना सुरू केली होती.’ (वृत्तसंस्था)
‘बॉक्सिंगमध्ये निष्पक्ष स्कोअरिंग होते. त्याचे आकलन केले तर तुमच्या लक्षात येईल की जजेसचे गुण बहाल करण्याचे निकष असतात. त्यात अनेकदा परिक्षक गुण देताना दडपणाखाली येतो. सरिताची लढत चुरशीची होती. दोन्ही खेळाडूंबाबत एक बाब समान होती. दोन्ही खेळाडू पंच लागल्यामुळे पडले नव्हते. तेव्हाही काऊंटिंग झाले आणि आजही तेच झाले.’
-शिव सिंग