चंदिलाप्रकरणी याच आठवड्यात निर्णय : बीसीसीआय
By admin | Published: December 22, 2015 03:06 AM2015-12-22T03:06:17+5:302015-12-22T03:06:17+5:30
२०१३ च्या आयपीएलमध्ये सामना फिक्स करण्याच्या आरोपात दोषी असलेले क्रिकेटपटू अजित चंदिला आणि हिकेन शाह यांच्या भविष्याचा निर्णय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयची तीन
मुंबई : २०१३ च्या आयपीएलमध्ये सामना फिक्स करण्याच्या आरोपात दोषी असलेले क्रिकेटपटू अजित चंदिला आणि हिकेन शाह यांच्या भविष्याचा निर्णय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयची तीन सदस्यीय शिस्तपालन समिती याच आठवड्यात घेणार आहे. शिस्तपालन समितीत ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शाह यांचा समावेश आहे.
या समितीला स्पॉट फिक्सिंगचा प्रयत्न करणाऱ्या क्रिकेटपटूंना आजीवन बंदीची शिक्षा देण्याचा अधिकार असल्याचे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले. २०१३ साली आयपीएलदरम्यान राजस्थान रॉयल्स संघातील सहकारी अंकित चव्हाण आणि एस. श्रीसंत यांच्यासोबत स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पोलिसांनी चंदिला याला अटक केली होती. (वृत्तसंस्था)