जखमी बोल्टचा आॅलिम्पिक सहभागाविषयीचा निर्णय गुरुवारी

By admin | Published: July 3, 2016 08:06 PM2016-07-03T20:06:53+5:302016-07-03T20:06:53+5:30

जखमी उसेन बोल्टला १00 मीटर, २00 मीटर आणि ४ बाय १00 रिलेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकण्याची संधी मिळणार किंवा नाही याविषयीचा निर्णय गुरुवारी घेतला जाणार आहे.

The decision on the Olympic bolt's Olympic participation on Thursday | जखमी बोल्टचा आॅलिम्पिक सहभागाविषयीचा निर्णय गुरुवारी

जखमी बोल्टचा आॅलिम्पिक सहभागाविषयीचा निर्णय गुरुवारी

Next

ऑनलाइन लोकमत
किंग्स्टन, दि. ३ : जखमी उसेन बोल्टला १00 मीटर, २00 मीटर आणि ४ बाय १00 रिलेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकण्याची संधी मिळणार किंवा नाही याविषयीचा निर्णय गुरुवारी घेतला जाणार आहे.
१00 मीटर, २00 मीटर आणि रिलेत बोल्टला परवानगी दिली जावी; अथवा नाही तसेच त्याच्या मेडिकल सवलतीच्या आग्रहावर विचार करण्यासाठी जमैका अ‍ॅथलेटिक्स प्रशासनिक संघटनेच्या (जेएएए) समितीची गुरुवारी बैठक होत आहे.

बोल्टने या स्पर्धेत २00८ बीजिंग आणि २0१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. बोल्टने जमैकाच्या आॅलिम्पिक ट्रायल्सच्या १00 मीटर फायनलमधून माघार घेतल्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगची थोडी दुखापत असल्याचे सांगितले होते.
विद्यमान १00 आणि २00 मीटरचा वर्ल्डचॅम्पियन आणि विश्वविक्रमवीर बोल्टने ट्रायल्समध्ये सहभागी न होता जमैकाच्या आॅलिम्पिक संघात स्थान दिले जावे, असे सांगत त्याने वैद्यकीय सुटीही मागितली आहे.

जेएएएच्या नियमानुसार आयएएएफच्या कामगिरीच्या आधारे बनलेल्या यादीतील अव्वल तीन जखमी खेळाडूला ट्रायल्समध्ये सहभागी न झाल्यासही संघात सहभागी करून घेतले जाऊ शकते; परंतु खेळाडूला खेळांच्या यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्याची आवश्यकता असते.

ब्लॅक आणि रिओ आॅलिम्पिकसाठी जमैकाच्या अ‍ॅथलेटिक्स संघाचे व्यवस्थापक लुडलो वाटस् यांनी निवड समिती गुरुवारच्या बैठकीत रिओ आॅलिम्पिकसाठी जमैका संघात कोणत्या अ‍ॅथलिटचा समावेश केला जावा याविषयी निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तथापि, बोल्ट २२ जुलैला लंडन अ‍ॅनिव्हर्सिरी स्पर्धेत सहभागी होईल, अशी आशा त्यांना आहे. तो २२ जुलै रोजी लंडन येथील स्पर्धेत धावेल आणि तेथे तो चांगला वेळ नोंदवेल, अशी आशा असल्याचे ब्लॅक यांनी सांगितले.

 

Web Title: The decision on the Olympic bolt's Olympic participation on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.