राजीनाम्याचा निर्णय पूर्णतः धोनीचा स्वतःचा - प्रसाद
By admin | Published: January 9, 2017 06:08 PM2017-01-09T18:08:03+5:302017-01-09T18:08:03+5:30
धोनीला कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडलं हे वृत्त चुकीचं आहे,कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय पूर्णतः धोनीचा स्वतःचा
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा स्वतःहून दिला नव्हता तर त्याच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता आणि त्याला कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडलं हे वृत्त चुकीचं आहे असं स्पष्टीकरण बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी दिलं आहे.
कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय पूर्णतः धोनीचा स्वतःचा निर्णय होता असं प्रसाद म्हणाले आहेत. धोनीला कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडलं असा खळबळजनक आरोप बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी केला होता त्यावर प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Reports(of him asking Dhoni to resign) are false, to step down as captain was solely MS Dhoni's decision: MSK Prasad,Chief Selector
— ANI (@ANI_news) 9 January 2017
काय होता आदित्य वर्मांचा आरोप ?
गुजरात आणि झारखंड संघादरम्यान झालेल्या रणजी उपांत्य सामन्यात झारखंड क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अमिताभ चौधरी यांनी धोनीकडे खेळण्याचा आग्रह धरला होता. मात्र, खेळण्यास नकार देत धोनीने संघासोबत मार्गदर्शक म्हणून राहण्याची तयारी दाखवली. धोनी मार्गदर्शन करत असतानाही झारखंड संघाचा या सामन्यात पराभव झाला होता. ही संधी साधून चौधरी यांनी 4 जानेवारी रोजी बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांना फोन केला आणि धोनीला त्याच्या भविष्यातील प्लानबाबत विचारणा करण्यास सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं होतं.
चौधरी यांच्या सांगण्यावरूनच प्रसाद यांनी धोनीला फोन केला आणि भविष्यातील प्लानबाबत विचारणा केली. अशी विचारणा होणे हे धोनीसाठी धक्कादायक होते. त्यामुळे धोनीने त्याचदिवशी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं वर्मा म्हणाले होते.