प्रशिक्षकाचा निर्णय २४ जूनला होण्याची शक्यता
By admin | Published: June 15, 2016 05:18 AM2016-06-15T05:18:40+5:302016-06-15T05:18:40+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) धर्मशाला येथे २४ जून रोजी बैठक होणार असून, तीत टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) धर्मशाला येथे २४ जून रोजी बैठक होणार असून, तीत टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआय कार्यकारी समितीची बैठक धर्मशाला येथे होणार असून, तीत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची नियुक्ती हा चर्चेचा मुख्य मुद्दा राहील, असे वृत्त आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, की बैठकीचा अजेंडा सर्वसाधारण आहे. पण, बोर्डाची समिती विंडीज दौऱ्याच्या पंधरवड्यापूर्वी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करणार असल्याचे निश्चित आहे. बोर्डाने जाहिरात प्रकाशित करताना या पदासाठी अर्ज मागविले होते. त्यासाठी माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे, संघाचे माजी संचालक व क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यासह निवड समितीप्रमुख संदीप पाटील यांच्यासह ५७ जणांनी अर्ज केले आहेत. अर्जांची छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद २०१४पासून रिक्त आहे.