दीपा करमाकरचे जोरदार स्वागत
By admin | Published: August 23, 2016 04:30 AM2016-08-23T04:30:43+5:302016-08-23T04:30:43+5:30
कोट्यवधी भारतीयाचे मन जिंकणारी जिम्नॅस्ट दीपा करमाकरचे सोमवारी स्वगृही परतल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले.
आगरतळा : रिओ आॅलिम्पिकमध्ये थोडक्यात पदक हुकले असले तरी कोट्यवधी भारतीयाचे मन जिंकणारी जिम्नॅस्ट दीपा करमाकरचे सोमवारी स्वगृही परतल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी मायदेशी परतलेली दीपा सोमवारी दिल्लीहून आपले आगरतळाला आली. यावेळी तिचे जल्लोषात स्वागत झाले. दीपा व तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्या स्वागतासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. दीपा व नंदी यांची एका खुल्या जीपमधून रॅली काढण्यात आली. १२ किलोमीटर अंतराच्या या रॅलीदरम्यान स्थानिकांनी दीपा जयघोष केला. दीपाच्या गळ्यात यावेळी फुलमाळांची गर्दी झाली होती. त्यानंतर दीपाला एका मोठ्या मैदानात नेण्यात आले. तेथे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी तिचा सत्कार केला.
यावेळी दीपाने मुली वाचवा, मुली शिकवा, मुलींना खेळण्याची संधी द्या, असा नारा दिला. दीपा म्हणाली, ‘मी तीन महिन्यांपूर्वी माझ्या पूर्वीच्या साहित्यासह सराव करीत होती. येथे अद्याप आॅलिम्पिक दर्जाचा बॅलेंस बीम व बार नाही. आता परिस्थिती बदलेल, अशी आशा आहे.’ (वृत्तसंस्था)