दीपा कर्माकर तंदुरुस्त, लक्ष आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्याचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:35 AM2017-12-10T00:35:25+5:302017-12-10T00:35:32+5:30
दीपा कर्माकर तंदुरुस्त झाली असून पुढील आठवड्यात राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणार आहे. मात्र राष्ट्रकूल स्पर्धेत ती सहभागी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
कोलकात्ता : दीपा कर्माकर तंदुरुस्त झाली असून पुढील आठवड्यात राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणार आहे. मात्र राष्ट्रकूल स्पर्धेत ती सहभागी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. दीपाचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी याबाबतीत कोणतीही घाई करणार नसल्याचे सांगितले. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त नंदी म्हणाले, की याबाबतचा निर्णय दीपाची प्रगती पाहिल्यानंतरच घेतला जाणार आहे.
मार्च महिन्यात याबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर एप्रिल २०१८ मध्ये होणा-या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत दीपाच्या सहभागाबात त्यांनी सकारात्मक संकेत दिले आहे. दीपाचे लक्ष्य आशियाई खेळच असणार आहे हे ही त्यांनी स्पष्ट केले.
नंदी म्हणाले,‘ मी तिची प्रग्रती पाहूनच निर्णय घेणार आहे. मात्र यात कोणतीही घाई केली जाणार नाही. ती जर तंदुरुस्त असेल तरी ती गोल्ड कोस्ट मध्ये निश्चित सहभागी होईल.’