दीपा, जितूसोबत साक्षीलाही खेलरत्न!

By admin | Published: August 18, 2016 11:34 PM2016-08-18T23:34:14+5:302016-08-18T23:34:14+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून एका रात्रीत स्टार बनलेली हरियाणातील रोहतकची महिला मल्ल साक्षी मलिक ही २९ आॅगस्ट रोजी खेलरत्नची मानकरी ठरेल.

Deepa, as well as witness to the game! | दीपा, जितूसोबत साक्षीलाही खेलरत्न!

दीपा, जितूसोबत साक्षीलाही खेलरत्न!

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 : रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून एका रात्रीत स्टार बनलेली हरियाणातील रोहतकची महिला मल्ल साक्षी मलिक ही २९ आॅगस्ट रोजी खेलरत्नची मानकरी ठरेल. राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार निवड
समितीने देशाच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर तसेच नेमबाज जितू राय यांच्यासोबतच साक्षीच्या नावाची श्फिारस केल्याचे समजते.

काल समितीने बैठकीनंतर पदक विजेत्यांसाठी पुरस्कार देण्याचा विचार केला होता. साक्षीने यंदा देशाला पहिले पदक मिळवून दिल्याने खेलरत्नची ती सर्वांत मोठी दावेदार बनली. आॅलिम्पिक वर्षांत एकापेक्षा अनेक खेळाडूंना खेलरत्न दिले जाऊ शकेल, अशी सरकारने आधीच घोषणा केली होती.

२००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकनंतर २००९ मध्ये आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार, बॉक्सर विजेंदरसिंग आणि पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम.सी. मेरिकोम यांना एकाचवेळी खेलरत्नने सन्मानित करण्यात आले. २०१२ च्या लंडन
आॅलिम्पिकनंतर मल्ल योगेश्वर दत्त आणि नेमबाज विजय कुमार यांना संयुक्तपणे खेलरत्न देण्यात आला. यंदा पुन्हा तीन किंवा त्याहून अधिक खेळाडूंना एकाचवेळी खेलरत्न मिळणार आहे. पुरस्कार निवड समितीने
साक्षीच्या नावाची अद्याप घोषणा केली नसली तरी लवकरच ती केली जाईल, असे
संकेत मिळाले आहेत.

५२ वर्षांत पहिल्यांदा भारतीय जिम्नॅस्ट म्हणून रिओत उतरलेल्या त्रिपुराच्या २३ वर्षांच्या दीपाने वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरीसह चौथे स्थान घेतले. विश्व रँकिंगमध्ये तिसरा असलेल्या सेनादलाच्या २९ वर्षांच्या जितूने दहा मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम फेरीत आठवे स्थान मिळविले.

खेलरत्नसाठी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव देखील होते. पण आॅलिम्पिकमुळे त्याची दावेदारी कमकुवत बनली. याशिवाय टिंटू लुका, अनिर्बान लाहिरी, विकास गौडा, मिताली राज आणि दीपिका पल्लीकल हिच्यासह दहा खेळाडूंनी आपापल्या महासंघांकडून अर्ज पाठविले होते

Web Title: Deepa, as well as witness to the game!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.