दीपाचा आॅलिम्पिक तिकीट मिळवण्याचा निर्धार; विश्वचषक जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी झाली सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:57 AM2018-11-22T05:57:10+5:302018-11-22T05:58:35+5:30
भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर ही टोकियो २०२० आॅलिम्पिक मध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने जर्मनीच्या कॉट्टबसमध्ये सुरू होत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्व चषकात सहभागी होईल.
नवी दिल्ली : भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर ही टोकियो २०२० आॅलिम्पिक मध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने जर्मनीच्या कॉट्टबसमध्ये सुरू होत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्व चषकात सहभागी होईल. चार दिवस रंगणाऱ्या या चॅम्पियनशीपमध्ये आठ स्पर्धा होणार आहे. त्यात जिम्नॅस्टकडे तीन आघाडीच्या स्कोअर करणाºयांच्या प्रारुपातून आॅलिम्पिक कोटा मिळवण्याची संधी राहील.
दीपा सोबतच भारतीय संघात बी.अरुणा रेड्डी, आशीष कुमार आणि राकेश पात्रा देखील असतील. रिओ आॅलिम्पिकमध्ये दीपा करमाकरचे पदक थोड्या फरकाने हुकले. दीपाकडून भारताला आता पदकाची आशा आहे. या वर्षी जुलैमध्ये विश्व चँलेंज कपमध्ये तीने सुवर्ण पदक मिळवले होते. अरुणानेही मेलबर्नमध्ये विश्व पोल व्हॉल्ट स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. आता ती आपला खेळ सुधारण्यास सज्ज आहे.
पुरूषांमध्ये भारताचे लक्ष आशिषवर असेल. त्याने २०१० अशियाई स्पर्धेत कांस्य पदक मिळवले. तसेच २०१० राष्ट्रकुल स्पर्धेतही एक कांस्य व रौप्य मिळवले. तसेच, साई आणि मान्यता नसलेल्या भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाच्या वादामुळे स्पर्धेच्या तयारीवर परिणामही झाला आहे. या वादामुळे साईने योगेश्वर सिंह व प्रणती दास यांचा खर्च करण्यास नकार दिला व चार जिम्नॅस्टला स्पर्धेत सहभागी होण्यास मंजूरी दिली. (वृत्तसंस्था)