दीपा कर्माकरने सचिनने दिलेली BMW परत करुन घेतली नवी कार

By admin | Published: December 30, 2016 10:57 AM2016-12-30T10:57:32+5:302016-12-30T11:41:43+5:30

रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावत जागतिक पातळीवर सर्वांची वाहवा लुटणारी भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकरने भेट मिळालेली महागडी बीएमडब्ल्यू कार परत केली आहे

Deepika Karmakar returns Sachin's gift to BMW | दीपा कर्माकरने सचिनने दिलेली BMW परत करुन घेतली नवी कार

दीपा कर्माकरने सचिनने दिलेली BMW परत करुन घेतली नवी कार

Next
>ऑनलाइन लोकमत
आगरतला, दि. 30 - रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावत जागतिक पातळीवर सर्वांची वाहवा लुटणारी भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकरने भेट मिळालेली महागडी बीएमडब्ल्यू कार परत केली आहे. बीएमडब्ल्यू परत करुन दिपाने 25 लाख किंमतीची ह्युंदाई एलांट्रा विकत घेतली आहे. रिओ ऑलिम्‍पिकमध्‍ये उत्कृष्ट कामगिरी केल्‍यानंतर हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्‍यक्ष व्‍ही. चामुंडेश्‍वरनाथ यांनी दीपासह, कुस्तीपटू साक्षी मलिक, बॅडमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधू यांना बीएमडब्‍ल्यू कार भेटस्वरुपात दिली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते ही कार या खेळाडूंना देण्यात आली होती.
 
(BMW ठरली पांढरा हत्ती, दीपा कर्माकर गाडी परत करणार?)
 
आगरताळामधील रस्त्यांची दुरावस्था बीएमडब्ल्यू परत करण्यामागे कारण ठरले असून शहरात कुठेही बीएमडब्ल्यूचं सर्व्हिस सेंटर नाही आहे ज्यामुळे दीपाने हा निर्णय घेतला. तिच्या शहरात कुठेही बीएमडब्ल्यूचं सर्व्हिस सेंटर नाही आहे. 'त्रिपुरामध्ये कुठेही बीएमडब्ल्यूचं सर्व्हिस सेंटर नाही. जर मी कार चालवत असेन आणि काही बिघाड झाला तर मी तो दुरुस्त कसा करणार ? आगरतलामध्ये गाडी चालवण्यासाठी चांगले रस्तेदेखील नाहीत. आगरतलासारख्या छोट्या शहरातील अरुंद आणि छोट्या रस्त्यांवर बीएमडब्ल्यू चालवणं कठीण असल्याची,' प्रतिक्रिया दीपाने दिली आहे. 
 
(दीपा कर्माकरच्या 'बीएमडब्ल्यू'साठी रस्ते होणार चकाचक)
(दीपा कर्माकरची ऐतिहासिक कामगिरी)
 
'माझे कोच बिसवेश्वर यांनी हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्‍यक्ष व्‍ही. चामुंडेश्‍वरनाथ यांच्याशी या मुद्यावर बातचीत केली. बीएमडब्ल्यूची किंमत असेल तितके पैसे माझ्या खात्यात टाकायला त्यांनी तयारी दर्शवली. बीएमडब्ल्यू कारच्या बदल्यात ते जे काही रक्कम देतील त्यात मी खूश असेन,' असंही दीपाने सांगितलं आहे. 
 
'दीपाने नुकतीच ह्युंदाई एलांट्रा विकत घेतली असून आगरतलामध्ये त्याचं सर्व्हिस सेंटरदेखील आहे,' अशी माहिती कोच बिसवेश्वर यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितलं आहे.
 
दीपा ऑलिम्पिकमध्ये ५२ वर्षांच्या कालावधीत सहभागी होणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. तिने या स्पर्धेत चौथे स्थान पटकावित आतापर्यंत निराश असलेल्या भारतीय पथकातील खेळाडूंना मान उंचावण्याची संधी दिली. त्रिपुराच्या दीपाने १५.०६६ चा सरासरी स्कोअर नोंदवित चौथे स्थान पटकावले. अमेरिकेच्या सिमोन बाईल्सने १५.९६६ च्या सरासरी स्कोअरसह सुवर्ण पदकाला गवसणी घातली तर रशियाच्या मारिया पासेकाने (१५.२५३) रौप्य आणि स्वित्झर्लंडच्या ग्युलिया स्टेनग्रबरने (१५.२१६) कांस्यपदक पटकावले.
 

Web Title: Deepika Karmakar returns Sachin's gift to BMW

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.