भारताच्या दीपिका कुमारीला रौप्यपदक; 18 वर्षांच्या कोरियन खेळाडूकडून हार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:25 PM2019-07-17T16:25:07+5:302019-07-17T16:25:39+5:30
भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीनं टोक्यो 2020 ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली.
नवी दिल्ली : भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीनं टोक्यो 2020 ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत तिला 18 वर्षीय कोरियाच्या अॅन सॅनकडून पराभव पत्करावा लागला. पात्रता फेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या दीपिकाला दुसऱ्या मानांकित सॅनकडून कडवी टक्कर मिळाली.
बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात दोन सुवर्णपदक जिंकणाऱ्या सॅनने पहिला सेट एका गुणाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सॅनने 29-25 असा विजय मिळवला. तिसऱ्या सेटमध्येही सॅनचे वर्चस्व राहिले.
Silver medal for Deepika!🏹🥈🇮🇳
— SAIMedia (@Media_SAI) July 17, 2019
A great show by @ImDeepikaK as she wins the silver medal in women’s recurve at the #Tokyo2020#Archery Test event.👏🏻
👉🏻She performed excellently at the competition beating 5 other archers on the way.
Wish her the best for her upcoming events.👍🏻 pic.twitter.com/LZVBWAkjfX
''मी सातत्यपूर्ण कामगिरी केली, परंतु अंतिम फेरीत सॅनच्या कामगिरीला तोडीस तोड कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. मी माझ्या खेळात काही तांत्रिक बदल केला आहे. त्यामुळे आणखी मला त्याची सवय झालेली नाही,'' असे दीपिकानं सांगितलं.
दीपिकाला पुढील वर्षी टोक्योत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित करता आलेली नाही, परंतु या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करत ऑलिम्पिक पात्रतेचं तिचं लक्ष्य आहे. ती म्हणाली,''सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास आम्ही ऑलिम्पिक तिकीट मिळवू, अशी अपेक्षा आहे.''