आयपीएल फिक्सिंगप्रकरणी २९ जून रोजी आरोपनिश्चिती

By admin | Published: May 24, 2015 01:24 AM2015-05-24T01:24:43+5:302015-05-24T01:24:43+5:30

इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पुढील महिन्यात २९ जून रोजी आरोप निश्चित केले जाणार आहोत.

Defamation on 29th June in the IPL fixing case | आयपीएल फिक्सिंगप्रकरणी २९ जून रोजी आरोपनिश्चिती

आयपीएल फिक्सिंगप्रकरणी २९ जून रोजी आरोपनिश्चिती

Next

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पुढील महिन्यात २९ जून रोजी आरोप निश्चित केले जाणार आहोत. त्याआधी ६ जूनपर्यंत आरोपींना स्वत:ची बाजू मांडावी लागेल.
आयपीएलच्या सहाव्या पर्वात आर्थिक लाभापोटी स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी राजस्थान रॉयल्सचे सहा खेळाडू एस. श्रीसंत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना आरोपी बनविण्यात आले आहे. या तिघांवरही आजीवन बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर तिघांची कारागृहाकडे रवानगी झाली होती.दिल्ली पोलिसांच्या विशेष अहवालाच्या आधारे सेशन कोर्ट आरोप निश्चित करणार आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी ४२ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून, या प्रकरणात अंडरवर्ल्डशी संबंधित काही नावेदेखील पुढे आली आहेत. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायालयाने अद्याप एकाही आरोपीविरुद्ध कठोर शिक्षा सुनावलेली नाही. (वृत्तसंस्था)

४अतिरिक्त सत्र न्यायाधीश निना
बन्सल कृष्णा यांनी सरकारी वकिलांकडून लेखी उत्तर मिळाल्यानंतरच आरोप निश्चित करण्याचा निर्णय राखून ठेवला होता. बचाव पक्षाच्या वकिलांनी मात्र, प्राथमिक तपासात आरोपींविरुद्ध मॅच फिक्सिंगचे कुठलेही पुरावे आढळून आले नसल्याचा युक्तिवाद केला.

४गतवर्षी जूनमध्ये न्यायालयाने श्रीसंत आणि चव्हाणला जामिनावर मुक्त केले. नंतर चंडीला यालादेखील जामीन देण्यात आला. आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक नावांचा समावेश असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे.

Web Title: Defamation on 29th June in the IPL fixing case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.