भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव

By admin | Published: March 16, 2016 08:26 AM2016-03-16T08:26:11+5:302016-03-16T08:27:25+5:30

जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणा-या भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाकडून पराभव पत्करावा लागला.

Defeat India's first match | भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव

भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव

Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १५ - जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणा-या भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाकडून पराभव पत्करावा लागला.न्यूझीलंडने भारताचा ४७ धावांनी पराभव केला.  
भारतीय गोलंदाजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्युझीलंडला २० षटकात धावावर १२६ धावात रोखले.त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची फलंदाची न्यूझीलंडच्या गोलंदाजीपुढे ढेपाळली. या सामन्यात भारताने सर्वबाद ७९ धावा केला.महेंद्रसिंह धोनीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र,तो अयशस्वी ठरला. महेद्रसिंह धोनीने ३० चेंडूत ३० धावा केल्या,तर रोहित शर्मा(५) शिखर धवन(१) सुरेश रैना (१) युवराज(४) हार्दिक पांड्या (१)आर. आश्विन (१०) आणि नेहरा शून्य धावेवर बाद झाला. 
भारतार्फे पहिल्याच षटकात आर अश्विनने धोकादायक मार्टीन गुप्टीलला पायचीत बाद करत भारताला पहिले यश मिळून दिले. तर दुसऱ्या षटकात अनुभवी नेहराने कॉलीन मुन्रोला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. आर अश्विन, नेहराने आणि रैना यांनी प्रत्येकी एका गड्याला बाद केले होते. रैनाने रॉस टेलरला धावबाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. अश्विनने आपल्या ४ षटकात ३२ धावा खर्च करताना एका न्युझीलंडच्या फलंदाजाला बाद केले. तर रैनाने सुरेख गोलंदाजी करताना आपल्या ४ षटकात १६ धावा देताना १ गडी बाद केला. बुमराने आपल्या ४ षटकात गोलंदाजी करताना १५ धावांच्या मोबदल्यात एक गडी बाद केला.
न्युझीलंडकडून कोरी अ‍ॅन्डरसन (३४)चा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला धावा जमवणे जमले नाही. त्यांचे फलंदाज ठरावीक अंतरावर बाद होत गेले. कर्णधार केन विल्यमस् (८) कॉलीन मुन्रो (७),मार्टीन गुप्टील (६), रॉस टेलर(१०), मिशेल सेंटनेर (१८), ग्रांट इलियट(९), ल्यूक रोंची (१९), यांनी धावांचे योगदान दिले.

Web Title: Defeat India's first match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.