क़े श्रीकांतला पराभवाचा धक्का
By admin | Published: November 23, 2014 02:23 AM2014-11-23T02:23:08+5:302014-11-23T02:23:08+5:30
जबरदस्त फॉॅर्ममध्ये असलेला भारताचा अनुभवी खेळाडू क़े श्रीकांत याला हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला़
Next
कोलून : जबरदस्त फॉॅर्ममध्ये असलेला भारताचा अनुभवी खेळाडू क़े श्रीकांत याला हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला़ त्यामुळे या स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले आह़े
बॅडमिंटन रँकिंगमध्ये कारकिर्दीतल्या सवरेत्कृष्ट 1क्व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतला उपांत्य फेरीच्या लढतीत चीनचा अव्वल मानांकित चेन लोंग यांच्याकडून 1 तास आणि 4 मिनिटांर्पयत रंगलेल्या लढतीत 17-21, 21-19, 6-21 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला़
हाँगकाँग ओपनमध्ये चीनचा चेन लोंग भारतीय खेळाडूंसाठी डोकेदुखी ठरला होता़ कारण, यापूर्वी त्याने भारताचा युवा खेळाडू अजय जयराम याला पराभूत करून स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविला होता़ अखेर श्रीकांतविरुद्धच्या सामन्यातही सरशी साधलीच़
या लढतीत श्रीकांतने मात्र चेनला सहजासहजी विजय मिळवून दिला नाही आणि सामना तिस:या गेमर्पयत खेचण्यात तो यशस्वी ठरला़ श्रीकांतने या सामन्यात एकूण 44, तर चेन याने 61 गुणांची कमाई केली़
चेन याने पहिल्या गेममध्ये आपल्या आक्रमक खेळाच्या बळावर 21-17 अशा फरकाने आपल्या नावे केला़ श्रीकांतने जोरदार कमबॅक करीत दुसरा गेम 21-19 ने जिंकून सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली; मात्र तिस:या गेममध्ये श्रीकांतला कामगिरीत सातत्य राखता आले नाही़ त्याला हा गेम 6-21 ने गमवावा लागला़ (वृत्तसंस्था)