डिव्हिलियर्सच्या तडाख्याने मुंबईचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2015 05:43 PM2015-05-10T17:43:33+5:302015-05-10T20:51:36+5:30

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा ३९ धावांनी पराभव करत रॉयल चॅलेंजर बेंगळूरने गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

Defechers defeated Mumbai by defeating Mumbai | डिव्हिलियर्सच्या तडाख्याने मुंबईचा पराभव

डिव्हिलियर्सच्या तडाख्याने मुंबईचा पराभव

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० -  आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा ३९ धावांनी पराभव करत रॉयल चॅलेंजर बेंगळूरने गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बेंगळूरच्या २३५ धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईला २० षटकांत ७ गडी गमावत १९७ धावा करता आल्या.
 
एबी डीव्हिलियर्सने अवघ्या ५९ चेंडूत फटकावलेल्या १३३ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबईसमोर विजयासाठी २३६ धावांचे आव्हान ठेवले आहे. बँगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र ख्रिस गेल लवकर (१३)  बाद झाल्याने बँगलोरला मोठ धक्का बसला. मात्र आजचा दिवस डीव्हिलियर्सचा होता हे त्याने सिद्ध केले. मुंबईच्या गोलंदाजांना झोडपून काढत त्याने अवघ्या ५९ चेंडूत १३३ धावा केल्या. त्याला कर्णधार विराट कोहलीचीही (नाबाद ८२) तितकीच चांगली साथ मिळाली आणि बँगलोरने २० षटकांत २३५ धावा केल्या. मुंबईतर्फे मलिंगाने १ बळी टिपला. 
बेंगळूरच्या विक्रमी धावसंख्येचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सलामीची जोडी लवकर फुटली. पार्थिव पटेल १९, रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर लँडिल सिमोन्सने (नाबाद ६८) किरॉन पोलार्डच्या (४९ धावा) साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर एकाही फलंजाने सिमोन्सला अपेक्षीत साथ दिली नाही. बेंगळूरच्या गोलंदाजांनी मुंबईला १९७ धावांवर रोखले.  

 

Web Title: Defechers defeated Mumbai by defeating Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.